भिक्षेकरी ते कष्टकरी एक अभिनव उपक्रम

Image may contain: one or more people and crowd
बारामती,ता.२८ डिसेंबर २०१९ (प्रतिनिधी): ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट,बारामती संचलित,शारदाबाई पवार महिला आर्ट्स,कॉमर्स आणि सायन्स कॉलेज तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ९ व्या राज्यस्तरीय स्वयंसिद्धा युवती संमेलनाचे गुरुवार (दि.२६ रोजी) उद्घाटन झाले.शुक्रवार (दि.२७) रोजी युवती संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता सहभागी युवतींनी अल्पोपहार करून,कृषी विज्ञान केंद्र,भाजीपाला गुणवत्ता केंद्र,कृषी महाविद्यालय तसेच शारदानगरच्या महत्वाच्या स्थळांना भेट दिली.

शुक्रवारी (दि.२७) रोजी दुसऱ्या सत्रात डॉ.अभिजीत सोनवणे यांनी सहभागी युवतींना मार्गदर्शन केले.सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखं त्यांनी शालेय जीवनही खोडकरपणे घालविले.डॉ.अभिजीत सोनवणे मूळचे म्हसवडचे १९९९ मध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊन ते उत्तीर्ण झाले.ज्ञानाला प्रात्यक्षिकांची जोड नसल्यामुळे खडकवासला जवळील अंगळबे गावामध्ये प्रॅक्टिस करीत असताना त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले.जीवनात आलेल्या नैराश्यातून आत्महत्या करण्याचा विचार त्यांच्या मनात आला.अशावेळी अंगळबे गावातील भिक्षेकरी दाम्पत्यांने त्यांना आधार दिला.पुढे मोठ्या पगाराची नोकरी लागली.पण पडत्या काळात आधार दिलेल्या भिक्षेकरी दाम्पत्याची त्यांना सतत आठवण येत होती.त्यातून पुढे १५ ऑगस्ट २०१५ रोजी सहा आकडी पगाराच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि पुन्हा एकदा ते रस्त्यावर आले.

आज ते लवकर उठतात आपल्या दुचाकीवर औषध-गोळ्या घेऊन ठराविक ठिकाणी म्हणजे मंदिरे-उद्याने,वेगवेगळे रस्ते-चौक या ठिकाणी जातात.त्या ठिकाणच्या भिकाऱ्यांशी संवाद साधतात.त्यांना मानसिक आधार देतात.त्यांना गोळ्या-औषध देऊन उपचार करतात.त्यांचं पुनर्वसन करतात.म्हणून लोक त्यांना "डॉक्टर ऑफ बेगर्स" म्हणतात.या भिकाऱ्यांनी काही छोटे व्यवसाय केले पाहिजेत असे त्यांना वाटले.म्हणून ते त्यांच्याकडे वारंवार आग्रह धरू लागले.पण भीक मागण्याची सवय लागलेल्या मनाला व्यवसायाची गोष्ट रुचेना.वारंवार समजावून सांगितल्यावर काही भिकारी व्यवसाय करण्यास तयार झाले.मग त्यांना डॉक्टरांनीच भांडवल आणि व्यवसायासाठी लागणारे साहित्य घेऊन दिले.इतर मदत केली.आज अनेक भिकाऱ्यांनी भीक मागायचं सोडून त्याच मंदिरात फुले विकणे,नारळ विकणे असे व्यवसाय सुरु केले आहेत.काहींनी भाजी विकणे तसेच इतर हंगामी व्यवसाय सुरू केले आहेत.आतापर्यंत ६२ लोकांनी भिक मागायचे सोडून देऊन स्वतःचे व्यवसाय सुरु केले आहेत.

आतापर्यंत त्यांच्याकडे  ११०० वृद्धांनी नोंदणी केली आहे.त्यांच्याकडे आलेल्या वृद्धांना ते स्वतःचे नाव देतात.त्यांना वृद्धाश्रमांमध्ये दाखल करतात.डॉ.अभिजीत सोनवणे म्हणतात,"भिकार्‍यांना भिक देण्यापेक्षा स्वावलंबी होण्यास आणि व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करा".मेलेल्या माणसाला खांदा देण्यापेक्षा जिवंत माणसाच्या हातात हात दया.महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.रा.बा.देशमुख यांनी संस्थेचे प्रतिक रोप देऊन डॉ.अभिजीत सोनवणे यांचा सत्कार केला. प्रा.शिवांजली धवन यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले.संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्र पवार,विश्वस्त सौ. सुनंदा पवार,मुख्य कार्यकारी अधिकारी प्राचार्य निलेश नलावडे,संस्था समन्वयक पी. एस. तनपुरे,महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.रा.बा.देशमुख,विद्याथी विकास अधिकारी प्राआर.एस.लोहकरे,उपप्राचार्य प्रा.ए. एस. कदम संस्थेतील सर्व पदाधिकारी,विभागप्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या