Video: शिरूरजवळ वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

Image may contain: outdoorशिरूर, ता. 3 जानेवारी 2020 : पुणे-नगर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना गुरुवारी (ता. 2) रात्री घडली.

शिरूरपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या बोऱहाडेमळ्याजवळ ही घटना घडली. शहरातील रिक्षाचालक एमआयडीसीतील कामगारांना साडेदहाच्या सुमारास रात्रपाळीच्या कामाला सोडण्यासाठी जात होते. यावेळी एका ट्रकची बिबट्याला जोरदार धडक बसली. धडकेमुळे बिबट्या उडून रस्त्याच्या दुभाजकावर जोरात आदळला.


दरम्यान, रिक्षाचालकांनी पोलिस व वन विभागाला याबाबत कळविल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी तसेच सहायक फौजदार संजय जाधव व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. वन विभागाच्या कर्मचाऱयांनी जवळ जाऊन पाहिले असता बिबट्या ठार झाला असल्याचे दिसून आले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या