ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरने घात केला अऩ्...

Image may contain: 1 person, night, text and closeup
शिरूर, ता. 4 जानेवारी 2019: ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरला झोला बसल्यामुळे एका शेतकऱयाला जीव गमवावा लागल्याची घटना निमगाव भोगी जवळ शुक्रवारी (ता. 3) पाचच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

किशोर राजाराम दंडवते (वय 37, रा. आमदाबाद) असे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱयाचे नाव आहे. हिरामण राजाराम दंडवते यांनी अपघाताची माहिती शिरूर पोलिसांना दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरामण दंडवते यांचा धाकटा भाऊ किशोर हे निमगाव भोगी येथील जमिनीची ट्रॅक्टरने मशागत करण्यासाठी जात होते. निमगाव भोगीच्या शेवाळे मळ्याजवळील वळणावर रोटाव्हेटरचा झोला बसल्याने ट्रॅक्टर उलटला. त्यावेळी दंडवते हे ट्रॅक्टरखाली सापडल्याने त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, किशोर यांच्या अपघाती मृत्युमुळे आमदाबादसह परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या