रांजणगाव देवस्थानचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

Image may contain: textरांजणगाव गणपती, ता. 4 जानेवारी 2020 (तेजस फडके): रांजणगाव गणपती देवस्थानच्या भोंगळ कारभाराचा भाविकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. भाविकांच्या श्रद्धेची खिल्ली उडवली जात असल्याबद्दल एका भाविकाने सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे रांजणगाव देवस्थानचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

अष्टविनायकांपैकी एक असलेल्या राजणगाव गणपती येथील महागणपतीच्या दर्शनासाठी भाविक विविध ठिकाणांहून येत असतात. मात्र, गैरसोयीअभावी भाविकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. भाविक याबद्दल सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करताना दिसतात. शिवाय, देवस्थानकडे लक्ष देण्यासाठी कोणी आहे की नाही? असा प्रश्न विचारून श्रद्धेची खिल्ली उडवली जात असल्याचेही भाविक सांगतात.

दरम्यान, रांजणगाव देवस्थानचे अध्यक्ष विजय दरेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, नाताळ सणामुळे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, एसी रुम सुस्थितीत आहेत.

मुंबई येथील भाविक नितीन राणे यांना आलेला अनुभव त्यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. त्यांची पोस्ट पुढील प्रमाणेः
आम्ही दि. २२ डिसेंबर रोजी रांजणगाव संस्थांनच्या भक्तनिवास मध्ये Ac रूम घेतला. परंतु, तेथील सोइसुविधांच्या अभावामुळे आमच्यासाहित बऱ्याच भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागला.
1) 2-2 तास रांगेत उभे राहूनही गाभाऱ्यात दर्शनावेळी पुरुष सुरक्षा रक्षक महिला भाविकांना हाताने बाजूला काढत होते. (महिला सुरक्षा रक्षक बाजूलाच उभी) याबद्दल विचारणा केल्यावर त्या आमच्या बहिणी आहेत, असे उत्तर मिळाले.
२) गरम पाण्याची वेळ सकाळी 7 वाजेपर्यंत सांगण्यात आली. प्रत्यक्षात पाणी 6.30 लाच बंद झाले. बरेच भाविक हातात बादल्या घेऊन पाण्यासाठी भटकत होते. विचारणा केली तर बंबासाठी लागणारे लाकडं संपली, असे उत्तर मिळाले.
3) AC रूम असून AC कुलिंग तर नाहीच त्यात खिडक्यांच्या काचा पण गायब. काचबंद होऊ न शकणाऱ्या रूम AC रूम म्हणून कशा दिल्या जातात? असा एकंदरीत प्रशासनाचा भोंगळ काभाराचा भाविकांना अनुभव येत आसतो. हि भाविकांच्या श्रद्धेची खिल्ली आणि अपमान आहे, तरी यात कामचुकरांवर योग्य कारवाईची अपेक्षा आहे.
- नितीन राणे, मुंबई.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या