शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न लवकरच मार्गी: डॉ. कोल्हे

तळेगाव ढमढेरे, ता. 2 जानेवारी 2020 (एन. बी. मुल्ला): शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा बैलगाडा शर्यतीचा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा चालू असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल, असे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी येथे सांगितले.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे श्री भैरवनाथ मुळोबा मंदिराचा लोकार्पण सोहळा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, 'आपण भक्तीची स्थाने उभी करीत आहोत त्याच पद्धतीने पुढच्या पिढ्यांचे भविष्य डोळ्यासमोर ठेवून कचरा आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभे करणे आवश्यक आहे.'

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, श्री भैरवनाथ मुळोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनिल भुजबळ, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रमेश भुजबळ यांची भाषणे झाली. यावेळी माजी आमदार सूर्यकांत पलांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे यांच्यासह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तळेगाव ढमढेरे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मुळोबा मंदिर व महादेव  मंदिराचे अवघ्या चौदा महिन्यात सुमारे अडीच कोटी रुपये ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले असून या मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी श्रींची आरती घेऊन कार्यक्रमास प्रारंभ झाला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या