Video: इंडियन ऑईलच्या वतीने ग्राहकदिन साजरा...

Image may contain: 2 people, people standing
रांजणगाव गणपती, ता.१३ जानेवारी २०२०२ (प्रतिनिधी): रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील साई-गणेश पेट्रोल पंपावर ९ जानेवारी रोजी इंडियन ऑईलच्या वतीने ग्राहकदिन साजरा करण्यात आला. यावेळी पेट्रोल पंपावर पेट्रोल,डिझेल भरण्यास आलेल्या प्रत्येक ग्राहकाचे इंडियन ऑईलचे वरीष्ठ अधिकारी शिवम श्रीवास्तव, मयंक अगरवाल तसेच पेट्रोल पंपाचे मालक तुषार काळे यांनी स्वागत केले.

यावेळी ग्राहकांच्या हस्ते केक कापुन इंडियन ऑईल तर्फे ग्राहकदिन साजरा करण्यात आला.पेट्रोल पंपावर आलेल्या प्रत्येक ग्राहकाला बर्फी देऊन त्याचे तोंड गोड करुन त्याचे स्वागत केले जात होते.या अनोख्या स्वागतामुळे पेट्रोल भरायला येणारे ग्राहकही भारावुन गेले. यावेळी इंडियन ऑईलचे वरीष्ठ अधिकारी शिवम श्रीवास्तव म्हणाले, ग्राहकांमुळेच आमची कंपनी देशातील पेट्रोल-डिझेल विक्री करणारी १ नंबर पेट्रोलियम कंपनी बनली आहे.त्यामुळे ग्राहकांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आम्ही दरवर्षी ९ जानेवारी हा दिवस इंडियन ऑईलचा ग्राहकदिन म्हणुन साजरा करतो.
यावेळी बोलताना साई-गणेश पेट्रोल पंपाचे मालक तुषार काळे म्हणाले,ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असुन ग्राहकांसाठी पंपावर विविध प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत.पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरवाढीमुळे ग्राहक आता CNG कडे वळाले आहेत.सध्या CNG ची मागणी वाढत असुन अनेक ग्राहकांनी चारचाकी वाहनांना CNG चे किट बसवून घेतले आहेत.तसेच नवीन CNG चारचाकी वाहन खरेदी करण्याकडे ग्राहकांना कल वाढला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या