...अन तब्बल २८ वर्षानंतर मिळाला आठवणींना उजाळा

Image may contain: one or more people and outdoorशिरुर,ता.१५ जानेवारी २०२०(प्रतिनीधी) : तोच वर्ग..तेच विद्यार्थी अन शिक्षकही तेच असा तब्बल २८ वर्षानंतर योग जुळुन आल्यानंतर चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आठवणींना उजाळा दिला.

शिरुर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात सन १९९२ साली बी.कॉमला शिक्षण घेतलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा नुकताच स्नेह मेळावा बोरा महाविद्यायात पार पडला.यावेळी अचानकच विद्यार्थ्यांनी भेट दिल्याने शिक्षकांनाही सुखद धक्का बसला.यावेळी प्राचार्य डॉ.के.सी.मोहिते यांनी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.तब्बल २८ वर्षानंतर भेटलेल्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयातील आठवणी जागा करत भावनांना वाट मोकळी करुन दिली.

बोरा महाविद्यालयातील गरीब गरजु होतकरु विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन यावेळी माजी विद्यार्थ्यांनी दिले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.सी.मोहिते, प्रा.आर.पी.गणोरकर, डॉ.पी.एस.वीरकर, प्रा.एस.एम.मिसाळ, डॉ. व्ही. व्ही. औटी, माजी प्राचार्य श्रीधर कडवेकर यांसह युनुस शेख, बाळासाहेब करंजुले, स्वाती धारिवालक/शहा, सिमा बोथरा, भारती शेलार/पवार, परेश शहा, सोनाली ढवळे, निलोफर पठाण/नायकवाडी, अरुण भुजबळ यांसह सुमारे ३४ माजी विदयार्थी, प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सहायक पोलीस निरीक्षक युनुस शेख यांनी मानले. 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या