राष्ट्र उभारणीत युवकांचा सहभाग महत्वाचा : नरवडे

Image may contain: 9 people, people standing
वाघोली,ता.१५ जानेवारी २०२० (प्रतिनिधी): तरुणांनी आदर्श जीवनासाठी आपले काहीतरी ध्येय ठरवले पाहिजे संघर्ष केला पाहिजे थोर व्यक्तिमत्त्वांच्या आदर्श घेऊन त्यांच्या विचारांतून सर्वांनीच प्रेरणा घेऊन स्वतःचे करियर निवडत असताना व ध्येयप्राप्ती करताना दुर्दम्य इच्छाशक्ती सकारात्मक विचारसरणी आव्हाने पेलण्याची क्षमता प्रयत्नांची पराकाष्ठा आणि सातत्यपूर्ण अभ्यास केला पाहिजे.जेणेकरून आपण विविध क्षेत्रांमध्ये अधिकारी झाला तर मान-सन्मान पद प्रतिष्ठा अर्थार्जन व जॉब सिक्युरिटी मिळेल असे प्रतिपादन मुंबईचे उत्पादन शुल्क अधिकारी एकनाथ नरवडे यांनी केले.

१२ जानेवारी रोजी भारतीय जैन संघटनेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय वाघोली येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यास केंद्रामध्ये युवा दिन व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी एकनाथ नरवडे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन प्रवासाची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली.

याप्रसंगी प्राध्यापक विजय अंधारे यांनीही आजचा युवक व स्थिती यावर विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद कुठे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचा आढावा व स्वामी विवेकानंद व युवक वर्ग यावर विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉक्टर अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र समन्वयक प्राध्यापक सचिन कांबळे यांनी केले सूत्रसंचालन सोनटक्के सर यांनी केले तर आभार अमर खराडे यांनी केले याप्रसंगी प्राध्यापक मानवतकर,पिंजरकर प्रा.ढेपे सर,मनोज दळवी,कमलेश जैन,सविता आवटे-तिवारी,एकनाथ नाईक उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या