शिरूर तालुक्यातील वाळू तस्करांची आता खैर नाही...

पुणे, ता. 16 जानेवारी 2020 : वाळू चोरीस आळा घालण्यासाठी महसूल आणि पोलिस विभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. यापुढील काळात वाळू चोरीचा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला.


हवेली आणि शिरुर तालुक्‍यातील वाळू चोरी रोखण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता. 15) जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी शिरुरचे आमदार अशोक पवार, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, 'ज्या गावात वारंवार वाळू चोरीचे प्रकार घडत आहेत, अशा गावांची आणि वाळू चोरी करणाऱ्यांच्या नावांची यादी तयार करावी. पोलिस ठाणेनिहाय भरारी पथके तयार करावीत. तसेच, तपासणीसाठी चेकपोस्ट तयार करावेत. वाळू चोरीचे प्रकार आढळून येणाऱ्या भागात सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळून आल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी.'

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या