रांजणगाव पोलिसांनी रोखली मांडूळाची तस्करी...

Image may contain: 6 people, people standing
रांजणगाव गणपती, ता.२१ जानेवारी २०२०२ (तेजस फडके): रांजणगाव पोलीसांकडून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच धडाकेबाज कामगिरी करण्यात आली आहे. विक्रीस चाललेल्या मांडुळाला पोलिसांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले आहे.

रांजणगाव गणपती गावातील ग्रामीण रुग्णालयासमोरील मातंग वस्ती मध्ये दोन व्यक्ती मांडूळ प्रजातीचा साप कब्जात घेऊन उभे आहेत, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी तातडीने पोलीस स्टाफला कारवाईचे आदेश देऊन रांजणगाव पोलिसांनी (दि १९) रोजी सकाळी ८:१५ वाजता रांजणगाव गणपती गावातील मातंग वस्ती येथे सापळा रचून दोन जणांना अटक केली.

मनीष सतीश लोखंडे (वय २२) तसेच अविनाश शंकर धुमाळ (वय २१ ) दोघेही राहणार रांजणगाव गणपती यांना ताब्यात घेऊन, त्यांच्याकडून चार फूट लांबीचा मांडूळ प्रजातीचा नर जातीचा साप पोलिसांनी ताब्यात घेतला. कायदेशीर प्रक्रिया राबवून रांजणगाव पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मांडूळ प्रजातीचा साप सुरक्षिततेच्या कारणास्तव शिरुर वनविभागाचे वनरक्षक व्ही एम चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी ऐश्वर्या शर्मा  मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांची सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम, पोलीस नाईक अजित भुजबळ, पोलीस नाईक मंगेश थिगळे, पोलीस नाईक प्रफुल्ल भगत, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र वाघमोडे सर्पमित्र समीर शहा यांनी केली.

सदरच्या दोन्ही व्यक्तींवर रांजणगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. १८/२०२० वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९(३),५१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक मंगेश थिगळे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या