शिरुरच्या पूर्व भागात अवैध धंदे जोरात...

शिंदोडी, ता. २१ जानेवारी २०२० (तेजस फडके) : शिरुर तालुक्याच्या पूर्व भागात ढाबा संस्कृती वाढत असून मोटेवाडी, निमोणे, गुनाट, निर्वी, करडे या परिसरात मोठया प्रमाणात अवैध दारू विक्री चालू आहे.कोणताही परवाना नसताना सर्रास होणारी दारू विक्री हि कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे.असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे.

निमोणे, गुनाट, निर्वी, चिंचणी, मोटेवाडी, करडे या परिसरात अनेक ढाबे व हॉटेल असून तिथे कोणताही परवाना नसताना सर्रास दारू विक्री केली जाते. तसेच गावठी दारू हि मोठया प्रमाणात विकली जाते.निमोणे येथे दर बुधवारी आठवडे बाजार भरतो. अनेक वेळा या तळीरामांचा त्रास बाजाराला येणाऱ्या सर्व सामान्य व्यक्तींना होतो. तसेच बाजारात येणाऱ्या महिलांनाही बऱ्याच वेळा या मध्यपींचा त्रास होतो. परंतु पोलिसांच्या दुर्लक्षामुळे ह्या तळीरामांना कोणताही धाक उरलेला नाही.

सर्रास अवैधरीत्या दारू विक्री चालू असतानाही पोलीस याकडं का दुर्लक्ष करत आहेत.याचे कोडे उलगडत नाही.गेल्या अनेक दिवसापासून दारू विक्री चालू असल्यामुळे अनेक वेळा येथे गंभीर अपघात देखील झाले आहेत.परंतु दारू विक्री मात्र थांबलेली नाही.त्यामुळे या अवैध दारू विक्रीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या