Vidoe: अवैध वाळू उपसावर आमदारांनी केले 'हे' विधान...

Image may contain: sky, ocean, outdoor, water and nature
शिंदोडी, ता. २२ जानेवारी २०२० (तेजस फडके): वाळू तस्करी रोखण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांनी पुढं येणं गरजेचं असून बोटावर मोजण्याइतके वाळूमाफिया आहेत. त्यांना वाळू उपसा करण्यास कडाडून विरोध केल्यास ते काहीही करु शकत नाहीत.  इनामगाव येथील ग्रामस्थांनी वाळू माफियांना विरोध केल्यानंतर त्या गावात वाळूउपसा पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे "गाव करील ते राव करील काय" हि म्हण तालुक्यातल्या इतर गावकऱ्यांनीही सार्थ करुन दाखवावी, असे प्रतिपादन शिरुर-हवेली आमदार अ‍ॅड अशोक पवार यांनी यांनी केले.


पुढे बोलताना आमदार अ‍ॅड अशोक पवार म्हणाले, नुकतीच जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी एक बैठक झाली त्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्या कोणत्याही वाळूमाफियाची गय केली जाणार नाही अश्या सक्त सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत.तसेच घोडधरणात चाललेला अवैध वाळू उपसा बंद व्हावा यासाठी अहमदनगरचे जिल्हाधिकारी आणि श्रीगोंद्याचे तहसीलदार यांच्याशी संपर्क साधुन वाळु माफियांवर कारवाई कारवाई करण्याची मागणी करणार आहे.


घोड धरणात मोठ्या प्रमाणात चाललेला बेकादेशीर वाळू उपसा थांबवावा.तसेच शासनाचा करोडो रुपये महसुल बुडत असुन शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्याच्या महसुल विभागाने वाळू माफियांवर संयुक्तिक कारवाई करावी अशी मागणी शिंदोडी येथील RTI कार्यकर्ते रामकृष्ण गायकवाड यांनी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या