शिरूर तालुक्यातील माहिरवासीनची 'म्हणून' आत्महत्या...

पुणे, ता. 22 जानेवारी 2020: विवाहानंतर अनेकवर्षांनी पहिली मुलगी झाल्यामुळे छळास कंटाळून शिरूर तालुक्यातील माहिरवासीनने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे.

विवाहानंतर अनेक वर्षांनी पहिली मुलगीच झाली, त्यामुळे घरात आनंद साजरा करण्याऐवजी केवळ मुलगा झाला नाही, म्हणून पती व सासऱ्याने विवाहितेचा छळ केला. त्यांच्या छळास कंटाळून अखेर विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घडना पुढे आली आहे. ही घटना चार नोव्हेंबर 2019 रोजी वडगाव शेरी येथे घडली. या प्रकरणाची चौकशी करून चंदननगर पोलिसांनी महिलेचा पती व सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.


नयना सतीश लोंढे (वय 27, रा. वाढेश्‍वरनगर, वडगाव शेरी) असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी दिलीप नरके (वय 53, रा. तळेगाव ढमढेरे, शिरूर) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून तिचा पती सतीश लोंढे व त्याच्या 70 वर्षीय वडिलांविरुद्ध चंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

पोलिस उपनिरीक्षक व्ही. एस. शिसाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'फिर्यादी यांची मुलगी नयना हिचा सतीश लोंढे याच्याशी 2009 मध्ये विवाह झाला होता. तेव्हापासून त्यांना मूलबाळ नव्हते. अनेक वर्षांनंतर त्यांना मुलगी झाली. नयना यांना मुलगा झाला नाही, तर मुलगी झाली, तसेच अन्य कारणांमुळे पती व सासऱ्याने तिला वेळोवेळी शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. या प्रकाराला कंटाळून नयना यांनी चार नोव्हेंबर 2019 रोजी घरातील स्वयंपाक घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. फिर्यादी यांनी याप्रकरणी पती व सासऱ्याविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी संबंधित घटनेची चौकशी करून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.'

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या