बारामती तालुक्यामध्ये गुरुवारी वीज पुरवठा बंद

Image may contain: sky, cloud and night
बारामती, ता. २२ जानेवारी २०२० ( प्रतिनिधी ): येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातून जाणारी महापारेषण कंपनीची २२० केव्ही भूमिगत वीजवाहिनीच्या कामासाठी व त्या ठिकाणी असलेली अति उच्चदाब टॉवर लाईन हटविण्याच्या पूर्वनियोजित कामासाठी गुरुवारी ( दि. २३ ) सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत बारामती शहर,एम.आय.डी.सी. व तालुक्याच्या परिसरात वीजपुरवठा बंद राहणार आहे.

महापारेषण कंपनीची जेजुरी ते बारामती ही २२०  केव्ही टॉवर लाईन बारामती एम.आय.डी.सी. मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणातून जात असल्याने ती भूमिगत करण्याचे काम सुरु आहे.त्या ठिकाणी अस्तित्वात असलेली अतिउच्चदाब २२० केव्ही टॉवर लाईन काढून टाकण्यात येत आहे.या दोन्ही कामांसाठी महापारेषणकडून गुरुवारी ( दि. २३ ) सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत बारामती २२० केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येईल.

पर्यायाने या उपकेंद्रातून महावितरणच्या विविध उपकेंद्रांना होणारा वीजपुरवठा देखील बंद राहणार आहे.त्यामुळे बारामती शहर, बारामती तालुक्याचा ग्रामीण भाग,एम.आय.डी.सी. परिसरातील वीजपुरवठा बंद राहणार आहे.या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे,अशी विनंती महापारेषण व महावितरणकडून करण्यात आली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या