शिरुरच्या अधिका-यांचा राज्याच्या प्रशासनावर वचक

Image may contain: outdoorशिरुर, ता. २२ जानेवारी २०२० (प्रतिनीधी) : राज्याच्या प्रशासनात सारथी संस्थेच्या सचिव पदी किशोरराजे निंबाळकर यांच्या नियुक्तीनंतर पुन्हा १५ अधिका-यांच्या बदल्यांमध्ये शिरुर तालुक्यातील अधिका-यांचा राज्याच्या प्रशासनावर नेमणुका झाल्याने राज्याच्या प्रशासनावर शिरुर तालुक्यातील अधिका-यांचा वचक राहणार आहे.

राज्यात सत्तास्थापनेनंतर प्रशासनात उच्चपदस्थ अधिका-यांच्या बदल्यांचे वारे सुरु असुन यात नुकतीच सारथी (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था) संस्थेच्या कारभारातून मुख्य सचिव जे. पी. गुप्ता यांची उचलबांगडी करण्यात आली असून, "सारथी'चा कारभार मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. निंबाळकर हे शिरूर तालुक्यातील  नाव्हरे गावचे भूषण आहे. किशोरराजे निंबाळकर यांनी या पुर्वी जळगावचे जिल्हाधिकारी म्हणुनही कामाचा ठसा उमटविला आहे.

साखर आयुक्त म्हणुन प्रभावी काम केलेले शेखर गायकवाड यांची पुणे महानगरपालिका आयुक्त म्हणुन नेमणुक झाली आहे. शेखर गायकवाड यांनी राज्याचे भुजल संचालनालयाचे संचालक, तसेच साखर आयुक्त म्हणुन काम पाहिले असुन साखर आयुक्त पदावर असताना विविध उपक्रम राबविले आहेत. पशुसंवर्धन आयुक्त म्हणुन काम पाहिलेले कांतिलाल उमाप यांची राज्य उत्पादनशुल्क आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

यांच बरोबर शिरुर तालुक्यातील अनेक अधिकारी राज्यात मंञालयात सचिव व वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, उत्पादन शुल्क अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस अधिक्षक, पोलीस उपअधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक या पदांवर कार्यरत असुन सुमारे १५०-२०० अधिकारी पोलीस खात्यात कार्यरत आहेत. विविध क्षेञात कार्यरत असणा-या या अधिका-यांची जिल्हयात नव्हे तर महाराष्ट्रात निर्भिड व कार्यक्षम अधिकारी म्हणुन ख्याती असुन राज्याच्या प्रमुख खात्यांवरच शिरुर तालुक्यातील अधिका-यांची नेमणुक असल्याने शिरुर तालुक्याचा राज्याचा प्रशासनावर मोठा वचक असल्याचे दिसुन येत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या