Video: कारेगाव-करडे रस्त्याच्या साईड पट्ट्या उखडल्या

Image may contain: tree, sky, grass, plant, outdoor and nature
कारेगाव, ता. २३ जानेवारी २०२० (तेजस फडके): कारेगाव-करडे  या रस्त्याची दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले आहेत.या रस्त्यावरून मोठया प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांची वाहतूक चालते. रांजणगाव औद्योगिक वसाहतीत कामाला जाणारे अनेक कामगार याच रस्त्याने जात असतात.या खड्ड्यांमुळे अनेक वेळा गंभीर अपघात झालेले आहेत. परंतु अजूनही सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याची दुरुस्ती केलेली नाही.


कारेगाव-करडे रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईट पट्ट्या भरण्याचे काम १५ दिवसांपुर्वी करण्यात आले होते. यावेळेस रस्त्याच्या दोन्ही बाजूने मुरूम टाकून साईट पट्ट्या भरण्यात आल्या.परंतु १५ दिवसानंतर लगेचच ह्या रस्त्याची दुरावस्था झाली असून साईट पट्ट्यांचा मुरूम पूर्णपणे उखडला आहे.त्यामुळे दुचाकी वाहन चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे.दोन्ही बाजूच्या साईट पट्ट्यांना टाकलेला मुरूम हा निकृष्ट दर्जाचा असल्याचे दिसत आहे.

तसेच मुरूम टाकताना त्यावर योग्य प्रकारे पाणी मारून रोडरोलर न फिरवल्याने हा मुरूम लवकरच उखडला असल्याचे काही वाहन चालकांनी सांगितले. त्यामुळे रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून प्रवास करताना दुचाकी वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. कारण दोन्ही साईट पट्ट्यांचा मुरूम उखडल्याने समोरून चारचाकी वाहन आल्यास दुचाकी वाहन चालकांना रस्त्याच्या खाली उतरावे लागते. त्यामुळे अनेक वेळा मुरुमामध्ये गाडी घसरल्याने गंभीर अपघात झालेले आहेत. त्यामुळे या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.

याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता एम.आर.सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता.त्यांनी सांगितले कि, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या द्विवार्षिक देखभाल दुरुस्ती निधी मधून या रस्त्याची दुरुस्ती केली असून यावर मुरूम टाकल्यानंतर पाणी मारून रोडरोलर फिरवलेला आहे.मी स्वतः जाऊन या रस्त्याची पहाणी करणार असल्याचे त्यांनी www.shirurtaluka.com शी बोलताना सांगितले.

  

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या