शिरूरला मोठी कारवाई; जुगार खेळणाऱयांची पळापळ...

Image may contain: 12 people, people standing
शिरूर, ता. 24 जानेवारी 2020: गोपाळ वस्ती (शिरूर) येथील इमारतीमध्ये सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिस उप अधीक्षक ऐश्‍वर्या शर्मा यांच्या पथकाने कारवाई करून 1 लाख 66 हजार 640 रोख रकमेसह एकूण 3 लाख 18 हजार 740 मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी 25 आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. शिरूर तालुक्‍यात सर्वांत मोठी व एवढ्या आरोपींना अटक करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
क्‍लबचा मालक नाना गव्हाणे याच्यासह 25 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरूर येथील गोपाळ वस्ती येथे अवैध पत्त्यांचा क्‍लब सुरू असल्याची माहिती दौंड विभागाच्या पोलीस उप अधीक्षक ऐश्‍वर्या शर्मा यांना मिळाली होती. त्यांनी गुरुवारी (ता. 23) दुपारी पोलिस अधीक्षक संदीप पाटील, बारामती विभागाचे अपर अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण खानापुरे, बारामती क्राईम ब्रॅंचचे निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक निरीक्षक गणेश जगदाळे, पोलिस कर्मचारी सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल आयवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, तसेच आरसीसी पथकातील सात पुरुष, पाच महिला, दोन पोलीस जवान यांच्या पथकाने हा छापा टाकला.

दरम्यान, पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकल्यानंतर पळापळ सुरू झाली. घटनास्थळावरून खुर्च्या, टेबलसह विविध वस्तू ताब्यात घेण्यात आले आहेत. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या