शिक्रापूरमध्ये सोशल मीडियामुळे घडली मायलेकाची भेट...

शिक्रापूर, ता. 25 जानेवारी 2020: सोशल मीडिया व शिक्रापूर पोलिसांमुळे हरवलेल्या मुलाची आणि त्याच्या आईची केवळ चार तासात भेट झाली. यामुळे सोशल मीडियाचे महत्त्व किती प्रभावशाली आहे हे समजते.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील फर्जिना खोले या दुपारी तळेगाव रस्त्याजवळील त्रिमूर्ती मंगल कार्यालय जवळून जात असताना त्यांना तीन वर्षाचा मुलगा भेदरलेल्या अवस्थेत रडत असल्याचे दिसला. त्यांनतर त्यांनी त्याला जवळ घेत त्यांचे पती भरत खोले यांना ही माहिती दिली. त्यानंतर खोले यांनी पत्रकार शेरखान शेख यांना याबाबतची माहिती दिली. त्यांनतर त्या मुलाला शिक्रापूर पोलिस ठाण्यात घेऊन आल्या व पोलिसांच्या ताब्यात दिला.

No photo description available.

सहायक उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण, पोलिस नाईक अशोक केदार, शेरखान शेख यांनी यांनी मुलाचा फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यांनतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शुभमचा फोटो सोशल मीडियावर पाहून त्यांनी त्वरित शिक्रापूर पोलीस स्टेशन गाठत आपल्या मुलाला कवेत घेत शिक्रापूर पोलिसांसह नागरिकांचे आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या