पुणे-नगर रस्त्यावर मेट्रोची गरज: अशोक पवार

शिरुर, ता. 25 जानेवारी 2020: पुणे-नगर रस्त्यावर मेट्रोची गरज आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदन दिले आहे, अशी माहिती आमदार अशोक पवार यांनी दिली.

शिरूर तालुक्‍यातील रस्त्यांची सुरू असलेली कामे, प्रस्तावित कामे याबाबतचा आढावा व रस्त्याच्या कामांची पाहणी आमदार पवार यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत केली, त्यावेळी नागरिकांशी चर्चा करताना त्यांनी वरील माहिती दिली. यावेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, बांधकाम विभागाचे अधिकारी सोनावणे यांच्यासह अन्य अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

दरम्यान, शिरूर-न्हावरा कर्डे, चव्हाणवाडी, निमोणे, इनामगांव, तांदळी, अष्टविनायक रस्त्या याठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची पाहणी आमदार पवार यांनी केली. ज्या ठिकाणी रस्त्याच्या कामासंदर्भात काही वाद असेल काही सूचना व प्रस्ताव असेल तर त्याबाबतची चर्चा त्यांनी पाहणीवेळी केले आहे. तालुक्‍यात अनेक ठिकाणी मोठ्या लेनच्या रस्त्याचे काम सुरू आहे.रस्ते मोठ्या प्रमाणावर खोदल्याने धूळ व अन्य गोष्टीच्या त्रास नागरिकांना व रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशी व वाहनचालकांना होत आहे. त्यामुळे अशा रस्त्याची कामे करणाऱ्या कंत्राटदारांची बैठक घेण्यात येणार आहे. शिरूर तालुक्‍यातील सर्व रस्त्यांची पाहणी आमदार पवार यांनी बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांच्यासमवेत केली आहे. शिरूर तालुक्‍यातील रस्ते अधिक काळ टिकणारे असावेत, यासाठी नवनवीन तंत्रज्ञान कामामध्ये घेण्यात येणार असल्याचे आमदार पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शिरूर तालुक्‍यात ज्या भागात रस्त्याचे काम सुरू आहे. त्या त्या भागात कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी रस्त्याच्या कामाचा दर्जा चांगला आहे का नाही, याबाबत स्वतः पाहणी करावी व निकृष्ट दर्जाचे काम असेल ते त्वरित वरिष्ठांच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन आमदार पवार यांनी नागरिकांना केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या