'त्या' ठगास गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक

Image may contain: 5 people, people standingरांजणगाव गणपती,ता.२५ जानेवारी २०२०(प्रतिनीधी): सोलर सिस्टीम च्या बॅट-या फसवुन घेउन गेलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असुन या प्रकरणी पोलीसांनी आरोपीकडुन ४० बॅट-या जप्त केल्या आहेत.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सतीश सुमंतराव गायकवाड (रा.परतुर, जि.जालना) याने कारेगाव ग्रामपंचायत येथील स्मशान भूमीतील व विठ्ठल मंदिर आवारातील सोलर सिस्टम च्या एकूण 85 बॅट-या दुरुस्ती करीता घेउन गेला होता.माञ त्या परत आणुन न दिल्याने फसवुन अपहार केल्याचा गुन्हा रांजणगाव पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला होता.

या गुन्हयाचा तपास गु्न्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली करत असताना गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरोपी सतीश  सुमंतराव गायकवाड यास यास नाशिक येथून ताब्यात घेतले.

तसेच एकुण चोरलेल्या बॅट-यांपैकी प्रत्येकी १६ हजार रुपये किंमतीच्या ४० सोलर सिस्टीम बॅट-या जप्त केल्या. हि कारवाई पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्ताञय गुंड, सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्ताञय गिरमकर,राजु मोमीन,जनार्दन शेळके, दयानंद लिमन, अक्षय नवले आदींनी हि कारवाई केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या