कोरेगाव भीमा दंगल प्रकरण NIA कडे वर्ग...

Image may contain: Mangesh Shahajirao Pawar, closeup
मुंबई, ता. २५ जानेवारी २०२० (प्रतिनिधी): केंद्र सरकारने कोरेगाव भीमा दंगल प्रकरण NIA कडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.यावरुन वातावरण तापलं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकावर घणाघाती टीका केली आहे.

कोरेगाव भीमा प्रकरणी SIT चौकशीच्या मागणी नंतर पाच तासात केंद्राने राज्य सरकारकडून तपास काढून घेतला,असंही पवार म्हणाले आहेत.एल्गार परिषदे संदर्भातील खटले खोटे आहेत.तसेच अधिकाऱ्यांनी गैरमार्गाने खटले भरले,असा आरोपही त्यांनी केला आहे.अन्यायाविरोधात बोलणं म्हणजे नक्षलवाद नाही,असं म्हणत त्यांनी सरकारला सुनावलं आहे.यावेळी पवार चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या घटनेच्या मूळाशी आम्ही जात होतो.कोणत्याही निर्दोष व्यक्तीला गुन्हेगार ठरवण्यात येऊ नये या दिशेने आमचा तपास होता.केंद्र सरकारचे कृत्य संशयास्पद आहे.सत्य बाहेर येण्याच्या भीतीने घाई घाईने NIA कडे तपास सोपवण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास राज्य शासनाला न सांगता NIA कडे सोपवण्यात आला. त्यामुळे केंद्र सरकार कोणाला तरी वाचवत असल्याचा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या