प्रजासत्ताक दिनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून झाली हि चूक

No photo description available.
मुंबई, ता. २७ जानेवारी २०२० (प्रतिनिधी): ७१ व्या प्रजासत्ताक दिना निमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून देशवासियांना फेसबुक,ट्‌विटरवर आणि इतर सोशल मीडियावरून देशवासीयांना शुभेच्छा देण्यात आल्या.शुभेच्छा देताना सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून वापरण्यात आलेल्या छायाचित्रामध्ये देशाचा चुकीचा नकाशा प्रसिद्ध करण्यात आला.

यामध्ये जम्मू काश्‍मीर आणि लडाखची सीमारेषा चुकली असून,पाकव्याप्त काश्‍मीर तसेच अक्‍साई चीन हे भाग दाखवण्यात आले नाहीत.खेळाडू, कलाकार,राजकीय नेते,पक्ष आणि विविध मान्यवरांनी देशवासीयांना सोशल मीडियावरून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.मात्र,प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसनं चुकीचा नकाशा पोस्ट केल्याचं समजल्यानंतर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.त्वरित चुकीचा नकाशा हटवावा असे काही नेटकऱ्यांनी म्हटले,तर एकाने थेट तक्रार दाखल करायचे का? असेही म्हटले आहे.

राष्ट्रवादीने प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना भारताचा नकाशा पोस्ट केला आहे.ज्यात खांद्यावर तिरंगा घेऊन साहसी कौशल्य दाखवणाऱ्या जवानांचा फोटो आहे.लोकशाहीचा उद्घोष करणारे भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो ! सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! असे कॅप्शन देण्यात आले आहे.



Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या