...म्हणून बुट हातात घेऊन फडणवीसांनी केले भाषण

शिरूर, ता. 28 जानेवारी 2020: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या व्यासपीठावर हातात बूट घेऊन वावरणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यावरुन राष्ट्रवादीने फडणवीसांचा समाचार घेतला आहे.

आपल्याच लोकांवर विश्वास नाही. चोरांच्या टोळीत बसलोय की काय, असा विश्वास वाटत असेल म्हणून बुट हातात घेऊन भाषण केले, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केली.


भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करुन महाविकास आघाडी सरकारचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी, पंकजा मुंडेंच्या व्यासपीठावर हातात बूट घेऊन वावरणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.


'देवेंद्र फडणवीसांचा आपल्याच कार्यकर्त्यांवर विश्वास नसून चोरांच्या टोळीत बसलोय की काय असं वाटत असेल, म्हणून बुट हातात घेऊन भाषण केले', अशी टीका राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केली आहे.औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पंकजा मुंडेंनी केलेल्या उपोषणाला देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. फडणवीस अगदी काही मिनिटंच व्यासपीठावर होते. यावेळी फडणवीसांनी बूट हातात धरल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.

रुपाली चाकणकर यांची टीका...
'विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसजी, आपण गेली पाच वर्षे राज्याचा विकास किती जलदगतीने केलाय, हे घसा ताणून सांगत होतात. प्रत्येक भाषणात महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे, हे ढोल बडवत सांगत होतात. चक्क आपण आज आंदोलनात सहभागी झालात. आपल्याच लोकांवर विश्वास नाही. चोरांच्या टोळीत बसलोय की काय, असा विश्वास वाटत असेल म्हणून बुट हातात घेऊन भाषण केले. विरोधात आहेत मान्य आहे, पण महाविकासआघाडी सत्तेत येऊन महिनाच झाला आहे. पाच वर्षातील तुमच्या सत्तेतील हिशोब द्या.' अशी मागणी चाकणकरांनी केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या