शरद पवारांची भूमिका दुटप्पी: माधव भंडारी

Image may contain: 1 person, beard
कोरेगाव भीमा, ता. २८ जानेवारी २०२० (प्रतिनिधी): गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे काही नेते कोरेगाव भीमा दंगली संदर्भात काही व्यक्ती आणि संघटनांवर आरोप करताना दिसत आहेत.त्यावरही पवार यांनी टीका केली आहे.मात्र या याप्रकरणी तपास करणाऱ्या चौकशी आयोगापुढे सादर केलेल्या शपथ पत्रात पवार यांनी आपण या संदर्भात कोणा व्यक्ती अथवा संघटनेवर आरोप करू इच्छित नाही,असे स्पष्टपणे नमूद केले असल्याचे भंडारी यांनी यावेळी सांगितले.

एल्गार परिषद,कोरेगाव भीमा प्रकरणी एस.आय.टी.चौकशीची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्यानंतर केवळ २४ तासात केंद्र सरकारने ही केस राज्य सरकारकडून काढून घेतली.याचा अर्थ आपल्या पत्रात उपस्थित केलेल्या शंका खऱ्या होत्या असा होतो.शरद पवारांनी घेतलेली ही भूमिका दुटप्पी आहे,असा घणाघाती आरोप भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला आहे.सोमवारी (ता. २७) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नुकताच केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एन.आय.ए) सोपवला तसेच आता राज्यात सत्तेत आल्यानंतर पवारांची भूमिका अचानक बदलली आणि ते व त्यांच्या पक्षाचे नेते काही व्यक्ती व संघटनांवर आरोप करू लागले आहेत.ज्या चौकशा केल्या,त्यात पी.बी.सावंत यांनी आपण जे बोललो नाही.ते आपले स्टेटमेंट म्हणून दाखल करून घेतले आहे,असे स्पष्ट केले आहे.त्यामुळे या सगळ्याची चौकशी करण्याची गरज होती,असे शरद पवारांनी सांगितले आहे.पवार यांनीच या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे ( एस.आय.टी) सोपविण्याची मागणी केली होती.

सध्या हा तपास राज्य पोलिसच करत आहेत.हेच पवार या घटनेची चौकशी एन.आय.ए.कडे सोपविण्याचा केंद्राच्या निर्णयावरही टीका करत आहेत,मग पवार यांचा नेमका विश्वास आहे तरी कोणावर,असा प्रश्न भाजपाने उपस्थित केला आहे.याच शपथपत्रात पवार यांनी समाज माध्यमांवर निर्बंध आणण्याची मागणी केली होती असंही माधव भंडारी यांनी नमूद केलं आहे.तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस हे स्वत: गृहमंत्रीही होते.त्यांनी विधानसभेत त्यावेळी निवेदन केले होते.त्यात त्यांनी कुठेही कथित आरोपी माओवादी होते,असा उल्लेख केलेला नव्हता.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या