प्रजासत्ताक दिनी ७० माजी सैनिकांचा भेटवस्तू देउन सन्मान

Image may contain: 7 people, people standing, sky and outdoorशिरुर,ता.२८ जानेवारी २०२० (प्रतिनीधी) : स्वतंत्र भारताच्या प्रजासत्ताक दिनी श्रीगणेशा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे शिरूर शहर, परिसर व तालुक्यांतील सुमारे ७०माजी सैनिकांना पुस्तक व भेटवस्तू देउन सन्मान करण्यात आला.

प्रजासत्ताक दिनी शिरुर येथील श्रीगणेशा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी  आजी माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.ध्वजारोहनानंतर हवेत फैरी झाडून ध्वजास सलामी देण्यात आली.यावेळी हॉस्पिटलचे संचालक डॉ.अखिलेश राजूरकर यांनी बोलताना सांगितले कि, श्रीगणेशा हॉस्पिटल ने शिरूर, पारनेर, व श्रीगोंदा तालुक्यातील रूग्णावर उपचार करत असताना सामाजिक भान ठेवत देशसेवेसाठी जीव पणाला लावणाऱ्या आजी माजी सैनिकांच्या उपचारांमध्ये सवलत देत आजतागायत सुमारे ४० लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत केलेले आहे.यापुढे ही हे उपचार चालू राहणार असून सैनिकांना सन्मान मिळावा यासाठी सातत्याने विधायक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तर डॉ.विशाल महाजन यांनी चांगले उपचार तसेच अल्पदरात अत्याधुनिक उपचार देण्यासाठी कटिबद्ध आहोत असे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबासाहेब चव्हाण यांनी केले.तर सुत्रसंचालन डॉ.सागर केदारे यांनी केले. डॉ. विशाल महाजन यांनी मानले. या वेळी हॉस्पिटल चे सर्व डॉक्टर्स, स्टाफ, शिरूर शहरातील नागरिक तसेच शिरूर तालुक्यातील आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या