शिरूरमध्ये रोमहर्षक सामन्यांनी पीआरडी चषकाची सांगता

शिरूर, ता. २८ जानेवारी २०२०(मुकुंद ढोबळे) : शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरायला लावणा-या रोमहर्षक सामन्यात अशोक पवार वॉरियर्स वाघोली संघाने प्रथम क्रमांक मिळवून पी आर डी चषकावर नाव कोरले तर द्वितीय क्रमांकाचा मानकरी रविकांत वर्पे व शरद पवार फायटर,शिरूर हा संघ ठरला.  

शिरुर येथे माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे यांच्या वतीने  उद्योगपती स्वर्गीय रसिकलाल माणिकचंद धारिवाल व शिवसेवा सचिव स्वर्गीय केशरसिंग खुशालसिंग परदेशी या दोन मित्रांच्या स्मरणार्थ सभागृहनेते प्रकाशशेठ रसिकलाल धारीवाल चषक (पी.आर.डी)चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते.

या स्पर्धेचा अंतिम सामना कार्यसम्राट आमदार अशोक पवार वाघोली व रविकांत वरपे,शरद पवार फायटर्स शिरूर या दोन संघात रंगला.उद्योगपती आदित्य धारिवाल यांच्याहस्ते नाणेफेक करुन अंतिम सामन्याची सुरुवात करण्यात आली.अत्यंत अटितटीच्या झालेल्या सामन्यात वाघोलीच्या संघाने चमकदार खेळी करुन पीआरडी चषकावर नाव कोरले.प्रथम क्रमांक मिळविणा-या कार्यसम्राट आमदार अशोक पवार वारियर्स वाघोली या संघास ७१ हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांक मिळविणा-या रविकांत वर्पे व शरद पवार फायटर्स शिरूर या संघास ६१ हजार रुपये व चषक, तृतीय क्रमांक मिळविणा-या मोहन राखपसरे फायटर्स शांतीनगर या संघास ५१ हजार रुपये व चषक तर चतुर्थ क्रमांक खंडू शेंडगे फायटर्स दौंड ४१ हजार रुपये व चषक अशी बक्षिसे देण्यात आली.आर.के.फायटर्स शिरूर हा शिस्तबद्ध संघ तर राहुल सातव हा मॅन अॉफ द सिरीज ठरला.त्यास हिरो होंडा बाईक भेट देण्यात आली.तर झालेल्या सर्व सामन्यांमध्ये बेस्ट बॉलर म्हणुन सुदाम खोडदे(ग्रामीण पोलीस) शिरूर, बेस्ट बॅट्समन-राहुल सातव वाघोली, बेस्ट विकेटकिपर-रजनीकांत पडवळ कुंजीरवाडी, बेस्ट कॅच नवनाथ सोनटक्के हे घोषित करण्यात आले तर सामन्यांत सलग तीन षटकार ठोकणा-या बाळा शिंदे याचा विशेष सन्मान करण्यात आला.अंतिम सामना पहाण्यास शिरूर शहर व तालुक्यांतून दहा हजार प्रेक्षक उपस्थित होते.

बक्षिस वितरण समारंभ आमदार अशोक पवार व उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल, माजी आमदार पोपटराव गावडे हस्ते झाला.यावेळी उद्योगपती आदित्य शेठ धारिवाल, शिवसेवा मंडळाचे विश्वस्त श्रीनिवास परदेशी,बाजार समितीचे संचालक राजेंद्र गावडे,मराठा सेवा संघाचे नामदेव घावटे,किरण महाराज भागवत,आयोजक रविंद्र ढोबळे,स्पर्धेचे संयोजक प्रशांत शिंदे,नगरसेवक जाकीर ख़ान पठाण, नगरसेवक विजय दुगड,संजय देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रवींद्र काळे,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी,युवकअध्यक्ष रंजन झांबरे, प्रा.दादासाहेब गवारी,प्रविण दसगुडे,दादाभाऊ वाखारे,अॅड.रविंद्र खांडरे,अॅड.प्रदिप बारवकर,आबिद शेख,अशोक पवार,बांधकाम व्यवसायिक सुभाष गांधी, तुकाराम खोले,आंबेगाव विधानसभा काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत पाचंगे,जयवंत साळूंके,जयसिंग धोत्रे, तिरंगा बिर्याणीचे फिरोज शेख, संजय चव्हाण,पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते,निलेश कोळपकर, सागर नरवडे,संतोष शितोळे, समालोचक फिरोज भाई बागवान,दत्ता पवार,गुलाम पठाण,रविंद्र जाधव, सागर ढवळे,राहुल पवार,सनी दळवी,राजेंद्र ढोबळे,विजय ढोबळे,अजय ढोबळे, तुषार माने, ऋतिक ढोबळे, तेजस माने, रवींद्र गुळादे राजेंद्र माने तसेच या स्पर्धेसाठी पुण्यातील नामांकित पंच व मोठया प्रमाणात शिरुर तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.

बक्षिस वितरण समारंभ प्रसंगी बोलताना शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार म्हणाले कि, शिरूर-हवेली तालुक्यातून भारतीय संघ रणजी संघ व आयपीएल सारख्या सामन्यात मजल मारण्यासाठी खेळाडूंनी प्रयत्न करावे यासाठी सर्व मदत करण्यार आहे.तर शिरूर सारख्या शहरांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिशय सुंदर, उद्योगपती प्रकाश रसिकलाल धारीवाल चषक क्रिकेट स्पर्धा भरवून शिरूर शहराचा नावलौकिक संपूर्ण राज्यात पोहोचवण्याचे काम माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे यांनी केले असल्याचे माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले.शिरूर शहरांमध्ये आयपीएल सारख्या क्रिकेट स्पर्धेचे हे आयोजन असून अतिशय सुंदर गॅलरी आणि आणि देखणे स्टेडियम उभारले आहे. या स्पर्धांचा जिल्हा व राज्यात नावलौकिक असल्याचे गौरवोद्गार उद्योगपती प्रकाश भाऊ धारीवाल यांनी काढले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या