करंदीमधील शेतकरी पुत्रांची भरारी; गावात आठ सीए...

Image may contain: 8 people, text
करंदी, ता. 29 जानेवारी 2020: शिरूर तालुक्यातील करंदी गावामधील शेतकरी पुत्रांची भरारी चर्चेचा विषय ठरली आहे. गावात तब्बल आठ सीए असून, त्यांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. परिसरामधून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
करंदीमधील आठ शेतकऱ्यांच्या मुलांनी शिक्षणातून भरारी घेतली आहे. गावातून तब्बल आठ सीए झालेले असून करंदीतील या शेतकरी पुत्रांची भरारी तालुक्‍यासाठी अभिमानास्पद असून शेतकरीपुत्र म्हणून एका अनोख्या क्षेत्रात यशस्वी होण्याची परंपरा देखील मिळविली आहे. गेल्या वर्षी करंदीच्या सात युवकांनी सीए टीममध्ये भरारी घेतली होती तर आता यावर्षी अनिल ढोकले या युवकाची त्यामध्ये भर पडली असून करंदी हे आठ शेतकरी पुत्र सीए असलेले गाव बनले आहे.

सीएचे गाव म्हणून आठ शेतकरी पुत्रांनी गावची नवीन ओळख निर्माण केली आहे. करंदी गावाला सीएच्या परंपरेची सुरुवात सन 1996 मध्ये हनुमंत राधू मांदळे यांनी केली. त्यानंतर रवींद्र बगाटे यांनी सन 2006 मध्ये, अंबर टाकळकर यांनी सन 2006 मध्ये, देवेंद्र दरेकर यांनी सन 2016 मध्ये, प्रशांत ढोकले यांनी सन 2017 मध्ये, संकेत ढोकले व शरद दरेकर यांनी सन 2019 मध्ये सीए बनण्याचा मान मिळवित करंदीची परंपरा जपली आहे, तर या चालू वर्षी या परंपरेला अनिल दादाभाऊ ढोकले यांनी पुढे चालविले आहे.आठ सीए पैकी प्रत्येक जण अगदी सामान्य शेतकरी कुटुंबातला आणि सामान्य शेतकरी पुत्र म्हणून गावात परिचित आहे. गावातीलच जिल्हा परिषद शाळा व विद्या विकास मंदिरमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेल्या अनिल ढोकले यांनीपदी शिक्षण पुण्यातील मॉर्डन महाविद्यालयात पूर्ण केले तर सीए इंटरशिपसाठी पुण्यातील एल.एम.जोशी ऍड कंपनीमध्ये 5 वर्षे अनुभव घेऊन यावर्षी दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी सीएची परीक्षा उत्तीर्ण होत करंदीचे आठवे सीए म्हणून नावलौकिक मिळविला आहे.
No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या