शिवसेनेची सामनातून केंद्र सरकारवर टीका...

मुंबई, ता. २९ जानेवारी २०२० (प्रतिनिधी): महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने रात्रीची सेवा बजावली.राजभवनाचा वापर केला,भुकेल्या लांडग्याने भक्ष्यावर झडप घालावी तशी राज्याच्या अधिकारावर झडप घालण्याची गरज नव्हती,असं म्हणत शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

रात्रीच्या अंधारात पाय ठेचाळू नयेत म्हणूनच महाराष्ट्र सरकारने रात्रीची मुंबई उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला.पण तिथंही काही झालं नाही.आता एल्गार प्रकरणी रात्रीच गृहमंत्रालयाने NIA ला महाराष्ट्रात पाठवलं.केंद्रात मोदी-शहांचे राज्य नक्कीच आहे पण महाराष्ट्रासह प्रमुख राज्ये त्यांच्या हातात राहिलेली नाहीत.हे लक्षण बरं नाही,अशी टीका शिवसेनेनं केली आहे

त्यामुळे काळोखात पाप करू नका,काय असेल ते उजेडात करा,असा टोला शिवसेनेनं भाजपला लगावला आहे.त्याची वेदना आम्ही समजू शकतो पण त्यांनी यंत्रणांचा हस्तक्षेप करून राज्यांवर दबाव टाकण्याचं तंत्र नाही,असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या