न्यूझीलंड विरुद्ध अशी रंगली सुपर ओव्हर...

Image may contain: 1 person, textहॅमिल्टन, ता. २९ जानेवारी २०२० : आज भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात तिसरा टी २० सामना सेडन पार्क येथे होत आहे.त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडलाही निर्धारित २० षटकात ६ बाद १७९ धावाच करता आल्या.त्यांच्याकडून कर्णधार केन विलियम्सनने ९५ धावांची अर्धशतकी खेळी केली.तर गप्टिलने ३१ धावांची खेळी केली.भारताकडून गोलंदाजी करताना शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमीने सर्वाधिक प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

रोमांचकारी झालेल्या या सामन्यात निर्धारित २०-२० षटकानंतर बरोबरी झाली.त्यामुळे या सामन्यात सुपर ओव्हर झाली.या सुपर ओव्हारमध्ये भारताने विजय मिळवला.फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताला १८ धावांचे आव्हान होते.भारताकडून रोहित शर्मा आणि kl राहुलने फलंदाजी केली.यावेळी भारताने पहिल्या ४ चेंडूत ८ धावा केल्या होत्या.त्यामुळे भारताला शेवटच्या २ चेंडूत १० धावांची गरज होती.पण त्यावेळी रोहितने दोन्ही चेंडूवर षटकार मारत भारताला विजय मिळवून दिला.

सुपर ओव्हरमध्ये प्रथम न्यूझीलंडने फलंदाजी केली.त्यांनी बिनबाद १७ धावा केल्या.न्यूझीलंडकडून केन विलियम्सनने ११ आणि मार्टिन गप्टिलने ५ धावा केल्या.या सुपर ओव्हरमध्ये भारताकडून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने गोलंदाजी केली.त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडलाही निर्धारित २० षटकात ६ बाद १७९ धावाच करता आल्या.त्यांच्याकडून कर्णधार केन विलियम्सनने ९५ धावांची अर्धशतकी खेळी केली.तर गप्टिलने ३१ धावांची खेळी केली.

भारताकडून गोलंदाजी करताना शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमीने सर्वाधिक प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.तत्पूर्वी या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ५ बाद १७९धावा केल्या होत्या आणि १८० धावांचे आव्हान न्यूझीलंडला दिले होते. भारताकडून रोहित शर्माने ६५ धावांची अर्धशतकी खेळी केली.तर विराट कोहलीने ३८ धावांची छोटेखानी खेळी केली.न्यूझीलंडकडून हमिश बेनेटने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या