पाकिस्तानी मंत्र्याने ओकली नरेंद्र मोदी यांच्या विरोधात गरळ...

Image may contain: 1 personनवी दिल्ली, ता. ३१ जानेवारी २०२० (प्रतिनिधी): देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण थंडीत देखील चांगलंच तापले आहे.भाजपला रोखण्याचा प्रयत्न काँग्रेस करीत असल्याने हि लढाई चांगलीच रंगतदार बनली आहे.लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण करत आहेत.राजकीय युद्धात पाकिस्तानची देखील एन्ट्री झाली आहे.

पाकिस्तानच्या मंत्र्यांने नरेंद्र मोदी यांच्या भाजपाला पराभूत करा असं आवाहन दिल्लीकरांना केले आहे.पाकिस्तानमधील मंत्री फवाद हुसैन यांनी ही मागणी केली आहे.फवाद हुसैन यांनी ट्विट करुन म्हटलंय की,भारतातील लोकांनी नरेंद्र मोदींना हरवलं पाहिजे.यावेळी दिल्ली विधानसभेत हरण्याची भीती असल्याने त्यांच्याकडून दबावाखाली अनेक अजब दावे करण्यात येत आहेत.

फवाद यांनी केलेलं ट्विट नरेंद्र मोदींच्या एका भाषणावर दिलेली प्रतिक्रिया होती.काश्मीर,नागरिकत्व सुधारणा कायदा आणि ढासळती अर्थव्यवस्था यावर देश-विदेशातून सुरु असणाऱ्या प्रतिक्रियेमुळे नरेंद्र मोदींचे मानसिक संतुलन बिघडलं आहे.फवाद यांनी केलेलं ट्विट नरेंद्र मोदींच्या एका भाषणावर दिलेली प्रतिक्रिया होती.

या भाषणात मोदी म्हणतात की,भारताचं सैन्य पाकिस्तानला ७ ते १० दिवसात हरवू शकतं.NCC च्या कार्यक्रमात मोदींनी हे भाष्य केलं होतं.शेजारील देश तीनदा युद्धात पराभूत झालेला आहे.ते लोक छुपं युद्ध लढत आहेत.त्या शेजारील देशाचा पराभव करण्यासाठी १० दिवससुद्धा लागणार नाहीत,असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला होता.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या