शिक्रापूरजवळ सासरा सुनेच्या शरीराला स्पर्श करायचा अन्...

शिक्रापूर, ता.३१ जानेवारी २०२० (शेरखान शेख): महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या असून आता चक्क सासऱ्याने सुनेवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका वाडी मध्ये घडली असून शिक्रापूर पोलिसांनी सदर विवाहितेच्या सासऱ्यावर गुन्हा दाखल करत नराधम सासऱ्याला अटक केली आहे.


शिक्रापूर (ता.शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीतील एका वाडी मधील पिडीत विवाहिता हि घरी असताना आणि तिचे पती कामाला गेलेले असताना पिडीतेचा सासरा नेहमी तिच्याकडे वाईट हेतूने पाहत विवाहितेच्या शरीराला स्पर्श करून तिच्या मनास लज्जा निर्माण होईल असे कृत्य करत असे, याबाबत पिडीतेने पती व इतरांना सांगून देखील सासऱ्याने त्याच्या वागणुकीत काहीही बदल केला नाही.

यांनतर देखील सदर नराधमाने सुनेला छळन्याचे कृत्य सुरूच ठेवले.त्यांनतर देखील सासऱ्याने विवाहिता एकटीच घरात असताना तिला बळजबरीने घरात घेऊन तिच्या शरीराला स्पर्श करत बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला आणि त्यांनतर याबाबत कोणालाही काही सांगितले तर तुझे नांदणे बंद करेल अशी धमकी दिली.त्यांनतर सदर विवाहितेने घडलेला प्रकार पतीला सांगितला आणि त्यानंतर घरात कोणीही नसताना पुन्हा सासऱ्याने पिडीतेचा विनयभंग केला असताना पिडीतेने गुपचूप मोबाईल मध्ये व्हिडीओ चित्रीकरण करून घेतले.याबाबत पिडीत विवाहितेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी नराधम सासऱ्यावर विनयभंग व बलात्कार प्रकरणी गुन्हे दाखल केले करत नराधम सासऱ्याला अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर हे करत आहे.

पिडीतेने केले पुरावा म्हणून विनयभंगाचे व्हिडीओ
शिक्रापूर (ता.शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीतील एका ठिकाणी सासरा घरात कोणी नसताना वारंवार सुनेवर अत्याचार करत असताना कोणीही याबाबत विश्वास ठेवत नसल्याने अखेर पिडीतेने घरात कोणीही नसताना घरातील एका ठिकाणी मोबाईल रेकॉर्ड चालू करून ठेवलेले होते व त्यांनतर सासरा घरात आला आणि त्याने पिडीतेचा विनयभंग करण्यास सुरवात केली आणि याबाबत सर्व काही प्रकार मोबाईल मध्ये रेकॉर्ड झाला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या