मुलींनो स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करा: अलका कुबल

Image may contain: 2 people, people standing
कारेगाव,ता.३१ जानेवारी २०२० (तेजस फडके): "मुलींनो तुमचे आई-वडील तुम्हाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात.तुम्हाला बाहेर शिक्षणासाठी पाठवतात.त्या मुलींनी ते ध्येय उराशी बाळगुन आपलं ध्येय आधी साध्य करुन आई-वडिलांचा विश्वास सार्थ ठरवला पाहिजे".आजकालच्या मुली वरवरच्या शो ला भुलतात.प्रेम करण्याला माझा विरोध नाही.आज काल गल्ली-बोळात प्रेमप्रकरणं चालु असतात.पण मुलींनी प्रेम करताना आई-वडिलांना विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत.आपल्या कुटुंबियांच्या नावाला काळिमा लागू नये याची काळजी मुलींनी घेतली पाहिजे.नारीशक्ती ने देशाचा इतिहास बदलला आहे.इतिहास घडवला आहे आणि नारीशक्ती देशाचा भविष्यकाळ असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी केले.कारेगाव (ता.शिरुर) येथे रांजणगाव एमआयडीसी  पोलीस स्टेशन,महिला दक्षता समिती पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी-कुंकू सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यास मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.


यावेळी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांनी आपल्या मनोगतामध्ये महिलांनि स्वतःला सुरक्षित ठेवण्या बरोबरच कायदा व सुव्यवस्था याचाही अभ्यास करून त्याचा आपल्या कुटुंबाला आपल्या मुलाबाळांना फायदा करून द्यावा.आपल्या हातात असलेल्या मोबाईल घरात असलेल्या टीव्ही चा आपल्या कुटुंबाला कसा फायदा होईल आपल्या समाजाला कसा फायदा होईल त्या दृष्टीने त्याचा वापर करावा त्यामुळे गैर गोष्टींना आळा बसेल आपले कुटुंब व आपला समाज निश्चितच बलशाली होण्यास वाव मिळेल व हे काम फक्त कुटुंबातील महिलाच करू शकते त्याचप्रमाणे महिलांनीही उद्योग व्यवसाय मध्ये संधी निर्माण करून त्याचा आपल्या कुटुंबाला कसा फायदा होईल याचा विचार करावा.तसेच याप्रसंगी हायर कंपनीच्या मनुष्यबळ विकास अधिकारी संचीता दास यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


यावेळी रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, केंद्रीय महिला आयोगाच्या सदस्या वंदना पोटे,भारतीय मिडीया फाउंडेशनच्या सदस्या स्वाती मोराळे, महिला दक्षता समितीच्या अध्यक्ष सुलभा नवले, कारेगावचे सरपंच अनिल नवले, ग्रामपंचायत सदस्य गणेश ताठे तसेच विविध संस्थांच्या महिला पदाधिकारी आणि पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सुत्रसंचालन श्वेता ओस्तवाल  यांनी केले तर आभार मनीषा पाचंगे यांनी व्यक्त केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या