सामुदायिक विवाह सोहळा हि काळाची गरज : वाखारे

Image may contain: 16 people, people standingशिरूर,ता.१ फेब्रुवारी २०२०(प्रतिनिधी) : सामुदायिक विवाह ही काळाची गरज असून नागरिकांनी सामुदायिक विवाह चळवळीत सहभागी व्हावे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांनी करून गेली सतरा वर्षे सुरू असलेली अल बैतूलमाल कमिटी ची सामुदायिक विवाह सोहळा चळवळ कौतुकास्पदच असल्याचे सांगितले.

शिरूर येथे अलमदद बैतूलमाल कमिटी,शिरूर यांच्यावतीने स्वर्गीय शहीदखान पठाण यांच्या स्मरणार्थ मुस्लिम समाजाचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी नगराध्यक्षा वैशाली वाखारे बोलत होत्या.यावेळी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नामदेव घावटे, माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण,पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, नगरसेवक मुजफ्फर कुरेशी ,मंगेश खांडरे, माजी उपनगराध्यक्ष नेमीचंद फुलफगर, माजी नगरसेवक अबिद शेख,मोमीन शेख ,रंजन झांबरे, निलेश खाबिया, अजय कदम, सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजक हाजी फिरोज बागवान ,फारुक बागवान ,अरिफ सय्यद, बादशहा मन्यार, शाबाद शहा, जलिल पठाण, हैदर शेख, लालू शेख फारुख सांगलीकर मुस्ताक भाई शेख व  सर्व समाजातील नागरिक, यंग सर्कल यावेळी उपस्थित होते.समाजात विवाह सोहळ्यात मोठ्या प्रमाणात खर्च होतो त्यातून अनेक कुटुंबांना आर्थिक ताण करायला लागतो सामुदायिक विवाह सोहळ्यात तुन या सर्व खर्चालाआळा बसण्याचे काम होत असते त्यामुळे सर्व समाजातील नागरिकांनी सामुदायिक विवाह सोहळा चळवळीत सहभागी होण्याचे आव्हान माजी नगराध्यक्ष जाकीरखान पठाण यांनी केले.

मुस्लिम समाजातील सामुदायिक विवाह सोहळ्यात आजपर्यंत 136 जोडप्यांचे विवाह पार पडले असून या विवाह सोहळ्यात तून समाजाला विवाह सोहळ्यात होणारा आर्थिक खर्च वाचविणे हा एकमेव उद्देश असून समाजाचेही प्रबोधन यातून करण्याचे काम  अलमदद बैतूलमाल कमिटी करीत असल्याचे सदस्य हाजी फिरोज बागवान यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या