शिरुर पोलीसांकडून सिनेस्टाइल पाठलाग करुन चोरटे जेरबंद

Image may contain: 8 people, people standing and beardशिरूर,१ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी) : शिरूर पोलीस स्टेशनसह जिल्ह्यातील सहा पोलीस स्टेशन हद्दीत विश्वास संपादन करून नागरिकांची सोने लुटणाऱ्या अट्टल चोरांच्या टोळीला शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे पथकाने सिनेस्टाइल पाटलाग करून पकडले.

चोरीचे सोने घेणारे दोघे सराफ यांच्यासह चार जणांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून 17 तोळे सोने एक एक विना नंबरची पल्सर मोटरसायकल असा एकूण सात लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. तर इतर सहा गुन्ह्याची कबुली आरोपींनी देऊन आरोपी कडून कायम चोरीचा सोने घेणारे दोन सराफ यांना अटक करण्यात आली असल्याने खळबळ उडाली आहे.

पोलीसांनी अशोक नामदेव गंगावणे (वय 30), त्याचा साथीदार अनिल रघुनाथ बेलदवडे (वय 31)दोघे राहणार बांदलवाडी बारामती जिल्हा पुणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून चोरीचे सोने घेणारे सराफ पंकज विलास शहाणे व सतीश लालचंद भंडारी या चार जणाना या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.याबाबत सुरेश बबन घावटे न्हांवरा शिरूर यांनी फिर्याद दिली होती.ही घटना १६ जानेवारी दुपारी अडीच वाजता घडली होती.याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, घावटे यांच्या फिर्यादीवरून 16 जानेवारी दुपारी अडीच वाजता न्हावरा फाटा शिरूर जवळ फिर्यादी यास वरील दोन्ही आरोपींनी मी तुम्हाला माझ्या लग्नाची पत्रिका द्यायला आलो असे पाया पडून सांगून त्यांचा विश्वास संपादन करून बोलता-बोलता मला सोन्याच्या अंगठ्या करायचे आहे मला तुमच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या आवडली आहे. अशाप्रकारे अंगठ्या मला करून घ्यायचे आहे असे सांगून विश्वास संपादन करून फिर्यादीच्या त्यातील तीन सोन्याच्या अंगठ्या चार तोळे तीन ग्रॅम वजनाच्या घेऊन फिर्यादी ढकलून देऊन सोन्याच्या अंगठ्या घेऊन आरोपींनी पळ काढला. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास  पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे कडे देण्यात आला.या गुन्ह्याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील दौंड विभागाच्या पोलीस उपाधीक्षक ऐश्वर्या शर्मा, शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असताना दिनांक 25 जानेवारी रोजी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे यांना काळया रंगाच्या पल्सर वर दोन तरुण संशयास्पद फिरताना दिसले. सदर तरुणांचा संशय आल्याने त्यांच्यावर पाळत ठेवून पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे यांनी पोलीस कर्मचारी संजय जाधव,जितेंद्र मांडगे, करणसिंग जारवाल, संजय साळवे, विजय जंगम यांना गाडी घेऊन बोलवले. यावेळेस दोघे तरुण शहराच्या बाहेर जाऊ लागले. यावेळी पोलिस पथकाने सदर तरुणांचा सिनेमे स्टाईल पाठलाग सुरू केला यावेळी वेळोवेळी आरोपींना थांबण्यास सांगितले पण ते थांबत नव्हते अखेर पोलिसांनी दोन्ही आरोपींना पकडण्यात यश आले.सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता आरोपींनी शिरूर,रांजणगाव गणपती , शिक्रापूर ,यवत ,वडगाव निंबाळकर अशा पोलीस स्टेशन हद्दीत नागरिकांचा विश्वास संपादन करून त्यांच्या सोन्याची लूट केली असल्याची कबुली दिली आहे. तर हे चोरीचे सोने घेणारे दोन सराफ यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 17 तोळे सोने, एक पल्सर असा एकूण सात लाखाचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे हे करीत आहे.
No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या