'इंटरव्ह्यू'ला निघालेल्या तरुणाचा शिरूरजवळ दुर्दैवी मृत्यू

Image may contain: text that says "Accident"शिरूर, १ फेब्रुवारी २०२०(प्रतिनीधी) : नोकरीसाठी इंटरव्ह्यू देण्यासाठी निघालेल्या पुण्यातील तरुणाचा शिरूरजवळ अपघाती दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली.

प्रथमेश गणेश लोंढे (वय 19, रा. कसबा पेठ, पुणे) असे मयत युवकाचे नाव असुन गुरुवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास हा अपघात झाला.प्रथमेश सोबत असलेला त्याचा आतेभाऊ अभिषेक आबा शिंदे (रा. पुणे) याने याबाबत पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी प्रथमेशला ठोकर देणारी स्कॉर्पिओ जीप (एमएच 14, एयू 3645) ताब्यात घेतली आहे. जीपचालक भगवान कडूजी मापारी (रा. धायपळ, ता. लोणार, जि. बुलडाणा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याला शुक्रवारी अटक करण्यात आली.मूळचा नगर येथील रहिवासी असलेला प्रथमेश लोंढे हा गेल्या काही वर्षांपासून कुटुंबीयांसह पुण्यात वास्तव्यास आहे. पुण्यातील देसाई कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत तो शिकत होता. परंतु नगर येथील एका खासगी कंपनीत नोकरीची संधी असल्याने तो अभिषेक शिंदे याच्यासह दुचाकीवरून नगरला जात होता. गुरुवारी (ता. 29) सकाळी इंटरव्ह्यू असल्याने बुधवारी रात्री उशिरा ते पुण्यातून निघाले. दरम्यान, रात्री साडेबाराच्या सुमारास शिरूर बायपासवरील एका स्टॉलवर चहा पिण्यासाठी थांबले. चहा घेऊन ते नगरकडे मार्गस्थ झाले. परंतु प्रथमेशची कागदपत्रांची बॅग चहाच्या स्टॉलवरच राहिली.

दरम्यान, चहाविक्रेत्याने कागदपत्रांवरील मोबाईल क्रमांकावरून प्रथमेशशी संपर्क साधला व बॅग विसरल्याचे सांगितले. तोपर्यंत प्रथमेश व अभिषेक नगर जवळील कामरगावपर्यंत पोचले होते. परंतु कागदपत्रांअभावी इंटरव्ह्यू देता येणार नसल्याने कागदपत्रांची बॅग घेण्यासाठी ते परत शिरूरला आले. संबंधित चहाच्या स्टॉलवरून बॅग घेऊन, प्रथमेश रस्त्याच्या पलीकडे लघुशंकेसाठी गेला. तेथून परतताना वाहनांची वर्दळ असल्याने तो रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावरच थांबला. त्याचदरम्यान, पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या जीपला समांतर चाललेल्या एका खासगी बसची हूल बसली. त्यात जीपचालकाचा ताबा सुटल्याने जीप दुभाजकावर चढली व तिची ठोकर प्रथमेशला बसली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.शिरूर पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली असून, सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील तपास करीत आहेत.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या