शिरूर बाजारसमितीत आढळला अनोळखी मृतदेह

Image may contain: one or more peopleशिरूर,१ फेब्रुवारी २०२०(प्रतिनीधी) :  शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शुक्रवारी सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत त्यांची ओळख पटू शकली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यम बांधा असलेली मृत व्यक्ती चाळीस ते पंचेचाळीस वयाची असून, रंग गोरा व उंची पाच फूट सहा इंच आहे. उजव्या हाताच्या मनगटात काळ्या मन्यांची माळ असून, काळ्या धाग्यात गुंफलेली स्वस्तिकची राखी आहे.

त्यांच्या अंगावर निळ्या-पांढऱ्या रेघांचा शर्ट; तसेच काळी पॅंट आहे. त्यांच्या कंबरेला खासगी सुरक्षारक्षकाचा पट्टा असून, त्यावर इंग्रजीमध्ये "एस' सिक्‍युरिटी लिहिलेला व "स्टार'चे चिन्ह असलेला बिल्ला आहे. या वर्णनाच्या व्यक्तीबाबत माहिती असल्यास शिरूर पोलिस स्टेशनशी (दूरध्वनी क्रमांक 02138-222139) संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस कॉन्स्टेबल विष्णु दहिफळे यांनी केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या