गॅस सिलेंडर २२५ रुपयांनी महागला...

No photo description available.मुंबई, ता. १ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): अर्थसंकल्पाविषयी सर्वांचीच उत्सुकता तानली गेली असताना व्यावसायिक गॅस दरात २२४.९८ रुपयांची वाढ झाली आहे.घरगुती गॅस सिलेंडरमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नाही.सध्या १३२५ रुपयांना मिळणारा व्यावसायिक गॅस सिलेंडर आता १५५० रुपयांना मिळणार आहे.आज सकाळपासून हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत.

सध्या सरकार एका वर्षात प्रत्येक घरासाठी १४.२ किलोच्या १२ सिलिंडरवर सबसिडी देते.जर त्यापेक्षा अधिक सिलिंडर हवे असतील तर बाजार मूल्यावर त्याची खरेदी करावी लागते.सरकार प्रत्येक वर्षी १२ सिलिंडरवर जी सबसिडी देते,ती प्रत्येक महिन्याला बदलत असते.मागील पाच महिन्यांपासून घरगुती गॅस (१४.२किलो) सिलेंडरमध्ये वाढ होत आहे.

पहिल्यांदाच फेब्रुवारीमध्ये अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरमध्ये वाढ झालेली नाही.व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये वाढ करण्यात आली आहे.त्यामुळे व्यावसायिकांचे बजेट आता वाढणार आहे.आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि विदेशी विनिमय दरातील बदलांसारखी कारणे सबसिडीची रक्कम निश्चित करता
त.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या