पाकिस्तान क्रिकेट मंडळाचं घुमजाव...

No photo description available.मुंबई, ता. १ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी):  भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत.या दोघांमध्ये बऱ्याचदा वाद विवाद झाल्याचे पाहायला मिळते.आता तर भारताने पाकिस्तानला मोठा धक्का दिल्याचे पाहायला मिळत आहे.एक मोठी गोष्ट पाकिस्तानमध्ये होणार होती.पण भारताने या गोष्टीला नकार दिला.त्यानंतर पाकिस्तानने भारताला धमकीही दिली होती.पण या धमकीला भारताने भीक घातलेली नाही,उलटपक्षी भारताने पाकिस्तानला मोठा धक्का दिल्याचे पाहायला मिळत आहे.

पाकिस्तान क्रिकेट मंडळानं (PCB) काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) इशारा दिला होता.जर आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानात येणार नसेल,तर पाकिस्तान संघ २०२१ या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेईल,असा इशारा पीसीबीनं दिला होता.पण,अवघ्या काही तासांत PCB नं घुमजाव करत तो इशारा किती पोकळ होता,हे स्वतः सिद्ध केले. BCCI ने पाकला जशासतसे उत्तर दिले आहे.त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटच्या मैदानाबाहेरची सामना रंगला आहे.

पाकिस्तानमध्ये न खेळण्याच्या भूमिकेवर भारतीय संघ ठाम राहीला आहे.त्यामुळे भारतापुढे पाकिस्तानला झुकावे लागले आहे.भारताने या स्पर्धेतून बाहेर पडू नये,यासाठी ने ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्यात यावी,यासाठी मान्यता दिली आहे.हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का असून त्यांना यजमानपद गमवावे लागले आहे.यंदाचा आशिया कप हा पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

शेजारील राष्ट्राशी संबंध पाहता टीम इंडिया पाकमध्ये जाणार नाही,हेही जवळपास निश्चित आहे.त्यामुळे भारताचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्याचा विचार आशिया क्रिकेट परिषद करत आहे.PCB कडून मिळत असलेल्या पोकळ इशाऱ्यांना अखेर बीसीसीआयकडून उत्तर मिळालं.२०१३ पासून दोन्ही देशांमध्ये द्विदेशीय मालिका झालेली नाही.उभय संघ आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी,वर्ल्ड कप आणि आशिया कप स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळतात.२०१८ मध्ये संयुक्त अरब अमिराती येथे आशिया कप खेळवण्यात आला होता.

पुढील आशिया कप पाकिस्तानमध्ये होणार असल्याचे ठरले होते.त्यावरून बीसीसीआयनं पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केली.भारतीय संघ पाकिस्तानात जाण्याची शक्यताच नाही,असे स्पष्ट मत बीसीसीआयनं व्यक्त केले.PCB या स्पर्धेचे यजमानपद भूषवित आहे,हा आमच्यासाठी मुद्दाच नाही.आम्ही तटस्थ ठिकाणी खेळणार हे आधीच स्पष्ट केले होते.त्यामुळे पाकिस्तानात आमचा संघ पाठवण्याचा संबंधच येत नाही,''असे BCCI च्या अधिकाऱ्यानं सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या