अज्ञात कारणावरून तरुणाची हत्या...

Image may contain: text

पंढरपूर, ता. २ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): मंगळवेढा तालुक्यातील मेटकरवाडी येथील सागर सुभाष वाघमोडे (२०) या तरुणाची अज्ञात कारणावरून हत्या करण्यात आली आहे.ही घटना सायंकाळी ७ च्या सुमारास खडकी गावात घडली आहे.याबाबत परिसरातील एका व्यक्तीने ही हत्या केल्याचा संशय मृताच्या नातेवाईकांना आहे.

मयत सागर वाघमोडे याचे आई-वडील हे कोल्हापूर जिल्ह्यात ऊस तोडणी करण्यासाठी गेले आहेत.सागर हा आज्जी जवळ राहत होता.त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हत्येमागचं नेमकं कारण काय आहे याचा छडा लावण्याचं काम पोलीस करत आहेत.

आर्थिक कारणांमुळे की इतर दुसऱ्या कारणांमुळे ही हत्या झाली हे शोधणं पोलिसांसाठी आव्हान ठरणार आहे.या भागात दरवर्षी उस तोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असतं.ज्या ठिकाणी ऊस आहे त्या ठिकाणी मजुर जात असतात.त्यामुळे अनेक प्रश्नही निर्माण होतात.घर दार सोडून बाहेरगावी जाण्यामुळे घरी वृद्ध मंडळी थांबलेली असतात.

सागर वाघमोडे हा खडकी चौकात थांबला असता अज्ञात कारणावरून एकाने तिथे येऊन सागर यास मारहाण केली त्यात जो जखमी झाला त्यास उपचारासाठी दवाखान्यात घेऊन गेले असता त्यास डॉक्टरांनी मृत घोषित केले.अशा आपल्या आजीला सांभाळण्यासाठी सागर हा गावात थांबला होता.तरुण नातवाची हत्या झाल्याने वृद्ध आज्जी आता पोरकी झाली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या