प्रफुल्ल शिवलेंच्या 'अवैध' प्लॉटींग वर हातोडा...

Image may contain: sky and outdoor
वाघोली, ता. २ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): सध्या हवेली तालुक्यात अनेक ठिकाणी शेतजमिनीचे अवैध तुकड्यात प्लॉटींग करुन विक्री करण्याचा मोठा सपाटा सुरु असतानाचं वाघोली परिसरातील वाघोली-केसनंद शिवेवरील केसनंद गावच्या हद्दीतील गट नं. १०१, १०२  प्रफुल्ल शिवलेच्या मंगलमुर्ती प्रा.लि च्या सनसीटीतील मधील प्लॉटींगवरील अवैध, अनाधिकृत बांधकामावर पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या वतीने (P.M.R.D.A) कारवाई करण्यात आली. सदर कारवाईत JCB व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने प्लॉटींगमधील सिमाभिंत,विक्री कार्यालय, काही किरकोळ बांधकामांवर हातोडा मारण्यात आला.
          
शिरुर-हवेली तालुक्यातील अनेक राजकीय भांडवलदारांच्या हितसंबधांने बहुचर्चीत असणाऱ्या या प्लॉटींगमधील बांधकामावर करण्यात आलेल्या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली, तर जमीन खरेदी-विक्री विश्वातील अनेक अनाधिकृत प्लॉटींगधारकांचे या निमित्ताने धाबे दणाणले. जवळपास दुपारी २ वाजेपासून सांयकाळी ५ वाजेपर्यंत हि कारवाई सुरु होती. परंतु,सुरुवातीला थोड्याफार पाडापाडीनंतर बऱ्याच वेळ सर्व अधिकारी बंद खोलीत जाऊन बसल्यामुळे बाहेर चर्चेला उधान आले होते. त्याचबरोबर कारवाई दरम्यान प्लाटींग धारकाने रागाच्या भरात चिडून जाऊन उपस्थित काही तरुणांना धक्काबुक्की करुन मारहाणही करण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे.

अतिक्रमण पाडत असताना सुरक्षेसाठी मोठा पोलीस फौजफाटा असतानाही असा प्रकार कसा काय घडला? याबाबत सर्व सामान्यांच्या मनात साशंकता निर्माण होत आहे.अनाधिकृत प्लॉट विकासक प्रफुल्ल शिवले हा भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आहे. यावेळी P.M.R.D.A च्या तहसीलदार गीता दळवी,अधिकारी मिलिंद पाठक यांच्यासह कर्मचारी व पोलीसांचा मोठा फौजफाटा या कारवाईत सहभागी झाला होता.

"सदर ६५ एकर  शेतजमीनीबाबतचे अनेक दावे महसूल प्रशासन व न्यायालयातही प्रलंबित असताना अवैधपणे प्लॉट पाडून विक्रीचा घाट घातल्याच्या अनेक तक्रारी पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडे (P.M.R.D.A) करण्यात आल्या होत्या.त्याचबरोबर अनेकदा प्राधिकरण कार्यालयासमोर आंदोलनही करण्यात आले होते. सदर जमीनीला लागून असलेल्या वनविभागाच्या जागेतील बेकायदेशीर रित्या झाडे ताडून व उत्खनन करुन सपाटीकरणही करण्यात आले होते. या कारवाईमुळे प्लॉटींग विश्वातील खरेदी-विक्री करणाऱ्यांचे धाबे मात्र नक्कीच दणाणले असल्याची जोरदार चर्चा सध्या परिसरात सुरु आहे."

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या