अट्टल दरोडेखोर शिरूरमध्ये पोलिसांच्या जाळ्यात...

No photo description available.शिरूर, ता. ३ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): पुणे जिल्ह्यातील आणि नगर जिल्ह्यातील अनेक गावात बंद घराचे दरवाजे फोडणे,खुनाचे प्रयत्न,जबरी दरोडा टाकून धुमाकूळ घालणारा अट्टल दरोडेखोरास पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या पथकाने शिरूर येथे छापा टाकून जेरबंद केले आहे.

गोरख नारायण भोसले (वय ४०, रा.हातवळण वाहिरा,ता. आष्टी, जि. बीड) असे या अट्टल दरोडेखोराचे नाव आहे.याबाबत पुणे गुन्हे अन्वेषण विभाग पोलिसांनी दिलेली माहिती अशी ३० ऑक्‍टोबर २०१९ रोजी पहाटे पावणेतीनच्या सुमारास फिर्यादी पवन सुभाष जाधव (रा. आरोळेवस्ती,जामखेड) हे त्यांचे कुटुंबीयांसह घरामध्ये झोपले असताना घराचा दरवाजा वाजवल्याने जाधव यांच्या आईने घराचा दरवाजा उघडला असता आलेल्या अज्ञात दरोडेखोरांनी आईच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण हिसकावून चोरून नेण्याचा प्रयत्न करत असताना बहीण माया मनोज लाड व वडील सुभाष जाधव यांनी दरोडेखोरांना विरोध केला.

मात्र दरोडेखोरांनी आई व बहिणीला मारहाण करून २५ सोन्याच्या मण्यांचे मिनी गंठण चोरून नेले होते.याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल होता.यामध्ये आरोपी दिपक उर्फ सलीम नारायण भोसले (वय २६),लखन उर्फ ढोल्या नारायण भोसले (वय १९, दोघे रा. हातवळण, बीड) यांना २६ नोव्हेंबर रोजी जामखेड पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्यात अटक केली होती.या दरोडेखोरांचे इतर साथीदार गोरख नारायण भोसले,नाजा उर्फ सोमीनाथ नेहऱ्या उर्फ दिलीप काळे,रावसाहेब विलास भोसले हे गुन्हा घडल्यापासून फरार होते.

१ फेब्रुवारी २०२० रोजी पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण पथकाला मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार पुणे ग्रामीण जिल्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी गोरख नारायण भोसले शिरूरला येणार असल्याची माहिती मिळाल्याने या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय गुंड,सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर,पोलीस हवालदार उमाकांत कुंजीर,पोलीस नाईक जनार्दन शेळके,राजू मोमीन शेळके,गुरुनाथ गायकवाड यांनी गोरख नारायण भोसले यास शिरूर येथे सापळा लावून ताब्यात घेतले.

पुढील तपासासाठी जामखेड पोलिसांच्या ताब्यात दिले.गोरख भोसले याच्यावर यापूर्वी दरोडा,खुनासह दरोडा,घरफोडी,बंद राहते घराची चोरी यांसारखे गुन्हे श्रीगोंदा,शिरूर,कर्जत,आष्टी पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या