९ फेब्रुवारीला या कारणासाठी असेल मनसेचा मोर्चा...

Image may contain: 1 person, eyeglasses

मुंबई, ता. ३ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २३ जानेवारीच्या महामेळाव्यात पाकिस्तानी बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध कडक भूमिका जाहीर केली.या महामेळाव्याच्या भाषणात त्यांनी घुसखोरांविरुद्ध मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणाही त्यांनी केली.येत्या ९ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या मोर्चा संदर्भात कुष्णकुंजवर बैठका देखील घेण्यात आल्या.

या मोर्चा दरम्यान नवीन माहिती समोर आली आहे.पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात मनसेच्या मोर्चाचा मार्ग अखेर ठरला आहे.हा मोर्चा गिरगाव चौपाटीपासून निघणार आहे.याआधी मोर्चाचा मार्ग मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून (भायखळा) आझाद मैदानापर्यंत ठरवण्यात आला होता.मुंबई पोलिसांनी भायखळ्यातून मोर्चा काढण्यास नकार दिल्याने हा बदल करण्यात आला आहे.

जे देशाशी प्रामाणिक आहेत,ते आमचेच आहेत.आम्ही कलामांना नाकारू शकत नाही.जहीर खानला नाकारू शकत नाही.जावेद अख्तर यांनाही नाकारू शकत नाही.ते म्हणाले उर्दू ही मुस्लीमांची भाषा कधीच नव्हती.बांग्लादेश बंगाली भाषेसाठी स्वतंत्र झाले.भाषा तुमच्या धर्माची नव्हे तर प्रातांची असते.पण हे जरी एका बाजुला असले तरी सरसकट म्हणून हे मान्य करायला तयार नाही.

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चाचा मार्ग नाकारला आहेहा मार्ग नाकारताना पोलिसांनी मनसेला पर्यायी मार्ग सुचवला आहे.मनसेकडून या नव्या मार्गाचे पोस्टरही प्रसिद्ध करण्यात आलेत.मी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे.

मी धर्मांतर केलेले नाही.माझ्या मराठीला नख लावण्याचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून अंगावर जाईल.हिंदू म्हणून कोणी मला नख लावले तर हिंदू म्हणून त्यांच्या अंगावर जाईल.जिथे धिंगाणा घालणार त्यांना आडवे येणार,असं रा:ज ठाकरेंनी आपल्या अधिवेशनात म्हटलं होतं.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या