आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांची माफी मागितली...

Image may contain: 2 peopleमुंबई, ता. ३ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एकेरी उल्लेखाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.त्या वक्तव्याबद्दल आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माफी मागितली.

सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन टीका करताना,आशिष शेलार यांनी कायदा लागू न करणं म्हणजे तुझ्या बापाचं राज्य आहे का,असं म्हटलं होतं.त्याबाबत त्यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं.

"मुख्यमंत्री महोदयांचा एकेरी उल्लेख केलेला नाही.कुठल्याही राजकीय नेत्याचा वैयक्तिक उल्लेख केलेला नाही.ती आमची संस्कृती,प्रथा परंपरा नाही.आम्ही सवाल उपस्थित केला आहे त्यावर ठाम आहोत.असं आशिष शेलार म्हणाले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या