पुण्यात पत्रकाराच्या मोटारीची जाणीवपूर्वक तोडफोड...

Image may contain: car and outdoor
पुणे, ता. 4 फेब्रुवारी 2020: 'सकाळ'चे वरिष्ठ उपसंपादक आणि www.shirurtaluka.comचे संस्थापक संतोष धायबर यांच्या मोटारीची जाणीवपूर्वक तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

मंगळवार पेठेतील कमला नेहरू हॉस्पिटल परिसरात श्री. धायबर यांनी मोटार पार्क केली होती. यावेळी अज्ञात व्यक्तीने मोटीचे तोडफोड करत हजारो रुपयांचे नुकसान केले आहे. याप्रकरणी त्यांनी गाडीतळ (फरासखाना) पोलिस चौकीत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून, श्री. डी. व्ही. ढोले हे पुढील तपास करत आहेत.


जाणीवपूर्वक तोडफोड...
श्री. धायबर यांनी रुग्णालयाशी संबंधित काही दिवसांपूर्वी बातमी दिली होती. या बातमीचा राग धरून जाणीवपूर्वक मोटारीचे नुकसान करण्यात आले आहे. परिसरामध्ये अनेक मोटारी पार्क केलेल्या आहेत. परंतु, फक्त पत्रकाराची मोटार पाहून तोडफोड करण्यात आली. मोटार पार्क केलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही नाही. परिसराची माहिती असल्यामुळे आपण पकडले जाणार नसल्याची खात्री झाल्यानंतर परिसरातील व्यक्तीने तोडफोड केल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.


पोलिस शोध घेणार का...
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पण, सीसीटीव्ही नसल्यामुळे संबंधित व्यक्तीचा खरोखरच शोध लागणार का? याबाबात संभ्रम आहे. दरम्यान, विविध संघटनांनी या घटनेचा निषेध केला असून, संबंधित व्यक्तीचा शोध लावण्याची मागणी करताना आंदोलन छेडणार असल्याचे सांगितले. सोशल मीडियावर अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या