मिर्जापूर जिल्ह्यात तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू...

Image may contain: 1 person, sitting
मिर्जापूर, ४ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी):  उत्तर प्रदेशच्या मिर्जापूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला.शाळेत मिड-डे जेवणाची तयारी केली जात असलेल्या भाजीच्या गरम मोठ्या टोपात पडून एका तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.जेवणाची तयारी केली जात असताना ही मुलगी या गरम टोपात पडली.सोमवारी दुपारी जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा स्वयंपाकघरात स्वयंपाकी कानात इअर फोन घालून गाणे ऐकण्यात तर्क होती.त्याचवेळी आंचलचा अपघात झाला.

खेळता खेळता  गरम भांड्यात पडलेल्या या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न न करता स्वयंपाक घरातील महिलांनी तेथून पळ काढला.मोठ्या प्रमाणावर अंग भाजल्यामुळं या चिमुरडीचा मृत्यू झाला.आंचल असे या चिमुरडीचे नाव असून मडीहान पोलिस ठाण्याच्या रामपूर अटारी गावात रुग्णालयात मृत्यू झाला.घरी हट्ट करून ही चिमुरडी आपल्या भावांबरोबर अभ्यासाचा आग्रह धरून शाळेत गेली होती.

या प्रकरणात मिरजापूरचे जिल्हादंडाधिकारी सुशील कुमार पटेल यांनी मुख्याध्यापकास निलंबित करण्यासह गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.रामपूर अत्री विद्यालयात मुलांसाठी मिड-डे जेवण केले जात होते.मिर्जापूर बेसिक एज्युकेशन ऑफिसर यांनी सांगितले की,'हे प्रकरण माझ्या हाती आले आहे.संबंधित गट शिक्षणाधिकार्‍यांकडून अहवाल आल्यानंतर मी याची चौकशी करून घेईन.

तपासणीनंतर कारवाई केली जाईल.मला सांगितले जात आहे की ती मुलगी या शाळेतील विद्यार्थी नव्हती".गेल्या काही महिन्यांपासून शाळेत येत होती आणि अजूनही वर्गात बसायची शिकत होती.मुलांबरोबर खेळत असताना ती भाजीच्या टोपात पडून गंभीर जखमी झाली.स्थानिक रुग्णालयानंतर तिला उपचारासाठी विभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आले,तेथे काही तासांच्या उपचारानंतर सायंकाळी आंचलचे निधन झाले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या