हळदी कुंकवाच्या माध्यमातुन शिरुरला सामाजिक सलोखा

Image may contain: 13 people, outdoorशिरुर,ता.४ फेब्रुवारी २०२०(प्रतिनीधी) : शिरुर येथील सुवर्णराज महिला मंडळाच्या वतीने हळदी कुंकवाच्या माध्यमातुन सामाजिक सलोखा गेल्या पाच वर्षांपासुन जोपासला जात आहे.

नववर्षातील पहिला सण मकरसंक्रांतीने सुरु होतो.मकरसंक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत महिला हळदी कुंकवाचे वाण लुटण्याचा कार्यक्रम आपआपल्या परीने साजरा करतात.शिरुर शहरातील महिलांच्या वतीने 'एक कॉलनी-एक हळदी कुंकवाचा वाण' हा उपक्रम गेल्या काही वर्षांपासुन सातत्याने आयोजित केला जात असुन याही वर्षी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.या उपक्रमाला परिसरातील महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

शिरुर शहरातील सुवर्णराज महिला मंडळ,ढोर आळी येथील सर्व महिलांनी एकत्र येऊन सामुहिक हळदीकुंकु समारंभाचे आयोजन केले होते.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका उज्वला बरमेचा,आदिशक्ती ग्रुपच्या शशिकला काळे ,वारसा फाऊंडेशनच्या मंजुश्री थोरात,राणी कर्डीले,ॲड.अमृता खेडकर,ॲड.सरिता खेडकर,डॉ.वैशाली साखरे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
 


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या