मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर काय बोलले मुख्यमंत्री...

Image may contain: 2 people, including Mahendra Kothari, people smilingऔरंगाबाद, ता. ४ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी):‘मराठवाड्याच्या बैठकांमध्ये हा पाण्याचा प्रश्न नक्कीच समोर आला आहे.हा खूपच मोठा प्रश्न आहे.मराठवाडा हा गेली काही वर्षे सतत दुष्काळात आहे,’असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना वृत्तपत्राला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीच्या माध्यमातून मराठवाडाच्या पाणी प्रश्नावर भाष्य केलं आहे.

यावेळी संजय राऊत यांनी घेतलेल्या ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रकाशित करण्यात आला.यावेळी मराठवाड्या पाणीप्रश्न महत्त्वाचा आहे.काय करणार त्याचं? असा सवाल संजय राऊत यांनी उ द्धव ठाकरे यांनी विचारला.या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांवर चर्चा केली.गेल्या काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर भाजपाच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलं होतं.या उपोषणाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थिती लावली होती.

यावेळी बोलताना ते म्हणाले की,‘मराठवाडा हा गेली काही वर्षे सतत दुष्काळात आहे.पाण्याचं दुर्भिक्ष्य प्रचंड आहे.मध्ये तर लातूरला ट्रेनने पाणी द्यावं लागलं होतं.तर त्यासाठी पाण्याचे जे काही प्रकल्प आहेत ते मार्गी लावण्यासाठी सुद्धा मी सूचना दिलेल्या आहेत.मी पंकजाला एक पत्र लिहिलं आहे की,तू हा जो मुद्दा काढला आहेस,ऐरणीवर आणला आहेस.धन्यवाद! पण त्याबद्दल सरकार संवेदनशील तर आहेच; पण हा प्रश्न पंकजाने मांडण्याच्या आधीच मी मार्गी लावण्याच्या सूचनादिलेल्या आहेत,’असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या