महात्मा गांधींना शिव्या देणारा रावणच...

Image may contain: 1 personनवी दिल्ली, ता. ४ फेब्रुवारी २०२० : आज जे महात्मा गांधींना शिव्या देत आहेत ते रावणाची आलाद असल्याचं वक्तव्य काँग्रसचे सभागृह नेते अधीर रंजन चौधरी यांनी केलं आहे.भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांना गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद लोकसभेत दिसले.महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा एक नाटक होतं.

महात्मा गांधींना शिव्या घालणारे रावणाची औलाद असल्याची तिखट प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.चौधरी यांच्या या वक्तव्यानंतर भाजपने सभागृहात गोंधळ घातला.अशा लोकांना भारतात महात्मा गांधी म्हणून कसं काय संबोधलं जातं?, असं वादग्रस्त वक्तव्य अनंतकुमार हेगडे यांनी केलं होतं.बंगळूरु येथे शनिवारी एका जाहीर कार्यक्रमात हेगडे बोलत होते.

आम्ही भाजपचे लोक महात्मा गांधी यांचे खरे अनुयायी आहोत.काँग्रेसची लोकं सोनिया आणि राहुल गांधींसारख्या खोट्या गांधींचे अनुयायी आहेत,असं वक्तव्य केंद्रिय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलं.यानंतर सभागृहात जोरदार गोंधळ पाहायला मिळाला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या