राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केली ही मागणी...

मुंबई, ता. ४ फेब्रुवारी २०२० (प्रतिनिधी): अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीची तारीख १९ फेब्रुवारी ही जाहीर करावी आणि तिथीचा हट्ट मुख्यमंत्र्यांनी सोडावा,अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे.

शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळी इंग्रज भारतात नव्हते.त्यामुळे इंग्रजी पद्धतीने कालगणनाही केली जात नव्हती.तेव्हा महाराजांची जयंती ही मराठी तिथीप्रमाणेच साजरी व्हायला हवी,अशी भूमिका शिवसेनेची आहे.मला पटतय, आपल्याला पटतय ना..?, असं अशा आशयाचं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.  

ट्विटसोबत त्यांनी एक फोटो शेअर केला आहे.त्यावर तिथीचा हट्ट सोडा आणि १९ फेब्रुवारीलाच शिवजंयतीची तारीख जाहीर करा,असं आवाहन मुख्यमंत्र्यांना केलं आहे.राष्ट्रवादीच्या आव्हानामुळे पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.आता मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेतात.हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या