मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाचा नकार...

नवी दिल्ली, ता. ५ फेब्रुवारी २०२० : मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.मराठा आरक्षण प्रश्नी १७ मार्चला पुढील सुनावणी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश तसेच नोकऱ्यांमध्ये मराठा आरक्षण लागू करावयाचे किंवा नाही,याबाबत सर्वोच्च न्यायालयात आज (५ फेब्रुवारी) सुनावणी पार पडली.

 सुनाणी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख झाल्याने सर्वोच्च न्यायालयात गोंधळ झाला होता.पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सुरू करावयाची असल्याने त्यात मराठा आरक्षण लागू करावयाचे किंवा नाही,या मुद्दय़ावर अंतरिम आदेशावर दाखल केलेल्या याचिकेवर नागेश्वर राव यांच्या अध्यक्षते खालील पीठापुढे आज (५ फेब्रुवारी) सुनावणी ठेवण्यात आली.यावेळी सर्वोच्च न्यायालयाने १७ मार्चपासून मराठा आरक्षणासंबंधी सुनावणीला सुरुवात करत याचिका निकाली काढणार असल्याचे सांगितले आहे.

शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला महाराष्ट्र सरकारने १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता.अगोदर मुंबई उच्च न्यायालयात या निर्णयाला याचिका दाखल करत आव्हान देण्यात आले होते.पण उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती.त्यानंतर याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आज झाली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या